आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan 2016 Thane

शंभर वृद्ध कलावंतांना अनुदान द्या, नाट्य परिषद बैठकीत संमत झाले सात ठराव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - राज्य शासनाकडून दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांपैकी फक्त साठच लोकांना अनुदान मिळते. त्यात वाढ करून किमान शंभर व्यक्तींना हे मानधन मिळावे, अशी मागणी करणारा ठराव अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत रविवारी एकमताने संमत करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाची जिल्हा स्तरावरील वृद्ध कलावंत मानधन शिफारस समिती अस्तित्वात आहे. या समितीत सांस्कृ़तिक क्षेत्रातील व्यक्ती, तसेच नाट्य परिषदेचे स्थानिक शाखेचे प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणूक व्हावी. नाट्य परिषदेच्या नियामक समितीच्या बैठकीत एकूण सात ठराव एकमताने संमत करण्यात आले. त्या ठरावांमध्ये नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी मांडलेला एक ठराव लक्षणीय होता. त्यांनी या ठरावात म्हटले, व्यावसायिक कलावंतांना महाराष्ट्र शासन ज्याप्रमाणे शासनाच्या सुविधा, दर्जा, पारितोषिके, सन्मान दिले जातात, त्याच पद्धतीने रंगमंच कामगारांनादेखील तो सन्मान मिळावा, अशी मागणी हे नाट्यसंमेलन करत आहे.

शालेय शिक्षण अभ्यासक्रमात नाट्यशास्त्र हा अभ्यासक्रम शिक्षण खात्याने अनिवार्य करावा. त्याचबरोबर हौशी नाट्य संस्थांना अनुदान देण्याच्या पद्धतीत शासनाने बदल करावा, हौशी रंगभूमीवरील नाटकांना तालमीसाठी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागी हॉल उपलब्ध करून द्यावेत, महाराष्ट्रातील नव्याने बांधण्यात येणाऱ्या नाट्यगृहासंबंधी अभ्यासू वास्तुविशारदाची निवड करावी म्हणजे नव्याने होणारे नाट्यगृह नाटकासाठी पोषक असतील.

प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृह : तावडे
राज्यातीलप्रत्येक जिल्ह्यासाठी एक नाट्यगृह शासनाकडून बांधले जाईल, अशी घोषणा सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी नाट्यसंमेलनात बोलताना केली. तावडे म्हणाले, जी नाट्यगृहे व्यवस्थेअभावी बंद आहेत किंवा नादुरुस्त आहेत अशी नाट्यगृहे शासनाकडून चालवली जातील. महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा हे हॉस्टेलसहित सुरू होईल. ही प्रक्रियाही लवकरच पार पडेल. याबरोबरच बालनाट्यासाठी मुंबईतील प्रभादेवी भागातील रवींद्र नाट्यमंदिर येथील एक हाॅल दिला जाईल, असेही तावडे यांनी सांगितले.