आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Kumar Donates Rs 50 Lakh Towards Drought Hit Maharashtra

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला आमिर, अक्षयकुमार धावले, दिले 50 लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे या अभिनेत्यांकडून स्फूर्ती घेऊन इतर कलाकार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. यात आघाडीवर आहे तो आमिर खान. आमिरसह अक्षयकुमारही बळीराजाच्या मदतीला धावून आला. आमिरने दोन गावे दत्तक घेतली असून अक्षयने ५० लाख रुपयांचा िनधी िदला आहे. अक्षयने याआधीही ९० लाख रुपये दुष्काळग्रस्तांना िदले होते.

आमिरने ताल आणि कोरेगाव ही दोन गावे दत्तक घेतली असून सध्या तो महाराष्ट्राच्या काही दुष्काळग्रस्त गावांच्या दौऱ्यावर आहे. ितथे जाऊन तो गावकऱ्यांना तज्ज्ञांच्या सोबतीने पाणी बचतीचे सल्लेही देत आहे. ‘रोख रक्कम देऊन तात्पुरता उपाय करण्यापेक्षा कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्यासाठी काय करता येईल, याकडे आपण लक्ष देत असून यासाठी दोन गावे दत्तके घेऊन ती िवकसित करून इतरांसमोर आदर्श उभा करण्याचा आपला प्रयत्न अाहे,’ असे आमिरने स्पष्ट केले आहे.

नुकतीच आमिरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्यमेव जयते वॉटर कप-एक जल व्यवस्थापन आणि विकेंद्रीकरण स्पर्धेला सुरुवात केली होती. फक्त चंदेरी दुनियेत न रमता समाजाच्या प्रती आपण काही देणे लागतो, असे मानणाऱ्या आमिरने याआधी गुजरातेतील भुजजवळचे एक गाव दत्तक घेतले होतेे. सन २००१ मध्ये झालेल्या भूकंपाच्या धक्क्यात हे गाव उद्ध्वस्त झाले होते. आमिरच्या प्रयत्नाने ते आता उत्तम सावरले आहे.
अक्षयने जलयुक्त शिवार अभियानासाठी ५० लाख रुपये िदले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलयुक्त शिवार योजनेसाठी मदत करणार असल्याची घोषणा अक्षय कुमारने काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानुसार ही मदत केली. अक्षय कुमारने याआधी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी तब्बल ९० लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानुसार तो महिन्याला १५ लाख अशी रक्कम सहा महिने देत आहे.
मुंबईतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दीड लाख रुपये
मंुबई - मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्तांना देण्याचा िनर्णय घेतला आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या हस्ते मानधनाचे दीड लाख रुपये गुरुवारी महापालिका आयुक्त अजय मेहता यांना देण्यात येणार आहेत. मुंबई महापािलकेत सध्या राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक आहेत. या नगरसेवकांच्या महिन्याच्या १ लाख ४० हजार रुपये मानधनात आणखी दहा हजार टाकून दीड लाखाची रक्कम दुष्काळग्रस्तांना देण्यात येईल, अशी माहिती मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी िदली. दुष्काळाची गंभीरता वाढली असून दुष्काळग्रस्त मराठवाडा, िवदर्भातील शेतकऱ्यांना आधार देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याआधी दुष्काळग्रस्त भागातील काही गावे दत्तक घेऊन मदतीचा िदला हाेता, असे अहिर यांनी सांिगतले.