आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Kumar\'s Next Film On Marathi Actor Dada Kondke

अक्षयकुमार काढतोय दादा कोंडकेंवर चित्रपट, उषा चव्हाणांचा मात्र अाक्षेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ पुणे - ‘७२मैल : एक प्रवास’ या चित्रपटाद्वारे मराठीत पाऊल ठेवलेला बाॅलीवूडचा अभिनेता अक्षयकुमार अाता दिवंगत अभिनेते दादा काेंडके यांच्या अायुष्यावर अाधारित ‘दादा’ हा चित्रपट काढत अाहे. संजय जाधव यांच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी अाहे. दरम्यान, अभिनेत्री उषा चव्हाण यांनी या निर्मितीवर अाक्षेप घेतला अाहे.
2016 च्या जानेवारीत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे अक्षयने ट्विटरवरून जाहीर केले. अक्षयच्या ‘गेझिंग गोट’ या प्रॉडक्शन हाऊसच्या कार्यालयात सध्या संहितेवर काम सुरू आहे. मात्र,या चित्रपटात दादांची भूमिका काेण करणार, इतर कलाकार काेण असतील याबाबत मात्र प्रचंड गाेपनीयता बाळगण्यात अाली अाहे. संजय सध्या ‘तू ही रे’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हा चित्रपट पूर्ण झाल्यावरच तो ‘दादा’च्या दिग्दर्शनाची सूत्रे हाती घेईल.
परवानगी घेतली नाही : चव्हाण
‘शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान’ने ‘दादा’ या चित्रपटाच्या निर्मात्यांसह संबंधितांवर कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत. दादांच्या नावावर अथवा जीवनावर चित्रपट काढण्याचा अधिकार फक्त प्रतिष्ठानला आहे, असे ट्रस्टच्या विश्वस्त उषा चव्हाण यांनी म्हटले आहे. कुणाला अशा स्वरूपाचा चित्रपट करायचा असेल, तर त्यांनी आधी ट्रस्टची रीतसर लेखी परवानगी घेतली पाहिजे अन्यथा ते गुन्हेगारी कृत्य ठरेल, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

दादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्युपत्रातील तरतुदींनुसार १९९८ मध्ये दादा कोंडके प्रतिष्ठान या ट्रस्टची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली आहे. वसंत भालेकर, उषा चव्हाण, संग्राम शिर्के, हृदयनाथ कडू देशमुख, अफरिन चौगुले, सायली वडारकर आणि ललिता वाकणकर हे ट्रस्टचे विश्वस्त आहेत. दादांच्या मृत्युपत्रातील पान क्रमांक १३ अन्वये दादांच्या जीवनावर वा चरित्रावर चित्रपट काढण्याचे सर्व अधिकार ट्रस्टकडे आहेत. त्यामुळे अक्षयकुमार तसेच अश्विनी यार्दी यांनी ज्या ‘दादा’ चित्रपटाची घोषणा केली आहे, ती बेकायदेशीर आहे. त्यांना तसे करण्याचे अधिकार नाहीत. चित्रपट काढायचाच असेल, तर तशी रीतसर परवानगी त्यांना ट्रस्टकडून घ्यावी लागेल अन्यथा हे गुन्हेगारी कृत्य ठरेल, अशी स्पष्ट भूमिका उषा चव्हाण यांनी मांडली आहे.
- दादांच्या नावाचे भांडवल करून कोट्यवधी कमावणाऱ्यांना ट्रस्टतर्फे कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ट्रस्टशिवाय कोणालाही दादांवर चित्रपट काढण्याचा अधिकार नाही. अक्षयकुमार, अश्विनी यार्दी यांना असे कुठलेही अधिकार नाहीत. -उषा चव्हाण, दादा कोंडके प्रतिष्ठान