आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय-सोनाक्षीची जोडी पुन्हा एकत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काही वर्षांपूर्वी अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफच्या जोडीने बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले. मात्र, आता अक्षय आणि सोनाक्षी सिन्हा यांची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. शिरीष कुंदर दिग्दर्शित ‘जोकर’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या जोडीचा ‘राउडी राठौर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भन्नाट यश मिळवून कमाईचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे जोकरकडून रसिकांना खूप अपेक्षा आहेत.
फराह खानचा पती अशीच ओळख असेलल्या शिरीषने याआधीदेखील सलमान खानला घेऊन ‘जानेमन’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर शिरीषने शाहरुखला चित्रपटासाठी विचारणा केली होती. मात्र, शाहरुखने त्याला नकार दिला होता. तेव्हापासून या दोघांचे अनेकदा खटके उडत होते. दोन महिन्यांपूर्वी या दोघांमध्ये एका पार्टीत हाणामारीदेखील झाली होती. फराह खान आणि शाहरुखची चांगली मैत्री आहे. मात्र, या प्रकरणानंतर त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. यामध्येच फराहने अक्षयला घेऊन ‘तीस मार खाँ’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर शिरीषने अक्षयसोबत ‘जोकर’ चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. या चित्रपटाची कथा ही स्वातंत्र्यपूर्व काळातील दाखवण्यात आली आहे. राउडी राठौरच्या यशानंतर अक्षय आणि सोनाक्षीची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहे.
फस्र्ट लूक झाला लीक- ‘जोकर’ या चित्रपटात चित्रांगदा सिंगवर एक आयटम साँग चित्रीत करण्यात आले आहे. या चित्रपटाचा फस्र्ट लूक हा इंटरनेटवर लीक झाला आहे. तसेच चित्रांगदाचे गाणे नेटवर धूम करत आहे. या प्रकारामुळे शिरीष भलताच नाराज झाला आहे. आता जोकरच्या अधिकृत फस्र्ट लूकची घोषणा काही दिवसांनंतर करण्यात येणार आहे.