आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई विमानतळाच्या कार्गो भागात अलर्ट; बॉम्बशोध पथक, CISF कडून तपासणी सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई विमानतळाच्या कार्गो भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. बॉम्बशोध पथक व सीआयएसएफकडून या ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली आहे. 26 जानेवारी 2018 रोजी किंवा कधीही कार्गोवर आयसिसकडून हल्ला होणार, अशी चिठ्ठी मुंबई विमानतळाच्या प्रसाधनगृहात लावलेली सापडल्याने सीआयएसएफकडून सुरक्षा तपासणी सुरू आहे.

 

पत्र सापडताच पोलिसांनी आणि बॉम्ब पथकाने कार्गो टर्मिनल रिकामे केले आहे. सध्या प्रवाशांची पूर्ण तपासणी करुनच त्यांना विमानतळावर सोडण्यात येत आहे. अद्यापही सर्च ऑपरेशन सुरुच आहे. मात्र, असं असले तरीही विमानाच्या उड्डाणांवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, सुरक्षेचा उपाय म्हणून तात्काळ कार्गो टर्मिनल खाली करण्यात आले आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...