आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी मृत्यूचे नाटक, आता घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठी अभिनेत्री अलका पुणेवारने आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी आधी मृत्यूचे नाटक केले तर आता पती संजयपासून घटस्फोट मिळावा म्हणून ठाण्यातील कौटुंबिक कोर्टात याचिका दाखल केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलका आणि पती संजय यांच्यात सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यानंतरच अलकाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोघांच्या सहमतीनुसार, संजयकडे दोन्ही जुळे मुले प्रतीक आणि पीयूष राहतील व त्यांचा संभाळ करील. तसेच आर्थिक पातळीवरचे प्रश्न सुटावेत म्हणून अलकाने संजयला पॉवर ऑफ अटर्नीचे सर्व हक्क दिले आहेत. ठाण्यातील स्वस्तिक पार्कमध्ये पुणेवार दांपत्य राहते. हा फ्लॅट संजय आणि अलका या दोघांच्या नावावर आहे. तसेच त्यावर बॅंकेचे कर्जही आहे. त्यानुसार फ्लॅटचे उर्वरित कर्ज व हक्क संजयकडे राहणार आहे.
44 वर्षीय अलका पुणेवार आपल्या 29 वर्षीय इंजिनियर प्रियकर आलोक पालीवालसोबत राहण्यासाठी पती संजयला घटस्फोट देत आहे. पतीपासून सुटका व्हावी म्हणून अलकाने आपली कार एका घाटातील दरीत ढकलून दिली होती. तसेच आपला मृत्यू झाल्याचे अलकाला भासवायचे होते. मात्र, अलकाने बिंग फुटले व ती प्रियकरासोबत चेन्नईत मजा मारत असल्याचे पुढे आले होते.