आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • All India Drama Council's Election Bogus Voting Paper Circulated

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ.भा. नाट्य परिषद निवडणुकीत बोगस मतपत्रिकांचे नाट्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अ.भा. नाट्य परिषद निवडणुकीत साडेबाराशे बोगस मतपत्रिका आढळून आल्या आहेत. यामुळे मुंबई विभागाच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे. इतर ठिकाणांहून अशाच तक्रारी असल्याने सहधर्मादाय आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी विश्वास ठाकूर यांनी सांगितले.
परिषदेच्या 38 जागांसाठी राज्यात मतमोजणी होत आहे. मुंबईतील 16 जागांसाठी 58 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेत अनेक गैरप्रकार उघड झाले. बोगस मतपत्रिका प्रकरणी चौकशीसाठी प्रदीप जगताप, अजित मोडक व विनायक रानडे यांची समिती नेमण्यात आली आहे.

समितीच्या अहवालानंतर पोलिसांत तक्रार देण्याविषयी घेतला जाईल. तसेच सध्या मुंबईपुरतीच प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले. मुंबई विभागातील मतदारसंख्या 6049 आहे. त्यापैकी 123 मतपत्रिका पत्ता न सापडणे किंवा तो बदलल्यामुळे परत आल्या होत्या. त्यामुळे 5926 मतदार पात्र ठरले होते. पण, मतमोजणीनंतर 5999 मतपत्रिका आल्याचे आढळून आले. कोणत्याही निवडणुकीत कधीही 100 टक्के मतदान होत नाही. त्यामुळे निवडणूक अधिका-यांनी मतपत्रिकांची छाननी केली असता 1257 मतपत्रिका बोगस असल्याचे आढळून आले, असे ठाकूर यांनी सांगितले.