आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात; साहित्य महामंडळाकडून घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- अंनिसच्या विराेधामुळे हिवरा आश्रम (जि. बुलडाणा) येथील विवेकानंद आश्रमाने प्रस्ताव मागे घेतल्यानंतर अाता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडाेदा येथे घेण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला अाहे. महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी ही माहिती दिली. 
 
संमेलन बडोद्याला व्हावे, यासाठी मराठवाडा साहित्य परिषद आधीपासूनच आग्रही होती. िवद्यमान संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे हेही बडोद्यासाठी आग्रही होते. दिल्लीचे नावही चर्चेत असल्याने मसापने शांत राहण्याची भूमिका घेतली. दिल्लीने प्रस्ताव मागे घेतल्याने बडोद्याच्या मागणीला बळ आले हाेते. त्यातच हिवरा स्थळाबाबत वाद झाल्याने महामंडळानेही बडाेद्यास पसंती दिली.
 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतला होता आक्षेप 
बुलडाण्याच्या हिवरा आश्रमात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला होता. हिवरा आश्रम हा वादग्रस्त शुकदास महाराजांचा असल्याने, त्या ठिकाणी संमेलन घेऊ नये, अशी मागणी अंनिसने केली होती.
बातम्या आणखी आहेत...