आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिस्थिती लवकरच सामान्य, रिझर्व्ह बँकेची परिस्थितीवर देखरेख : ऊर्जित पटेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नाेटबंदीच्या निर्णयानंतर २० दिवसांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी माैन साेडले अाहे. ‘सामान्यांचा त्रास कमी करण्यासाठी अावश्यक उपाययाेजना करण्यात येत असून रिझर्व्ह बँक परिस्थितीवर दरराेज देखरेख ठेवून अाहे. त्यामुळे लवकरात लवकर परिस्थिती सामान्य हाेईल,’ असा अाशावादही त्यांनी व्यक्त केला. बनावट नाेटा राेखण्यासाठीच अाता पाचशे व दाेन हजार रुपयांच्या नाेटांच्या अाकारात व रचनेत बदल केल्याचे पटेल यांनी स्षष्ट केले.

लाेकांनी अार्थिक व्यवहार अधिक सुलभ हाेण्यासाठी डेबिट कार्ड अाणि डिजिटल वाॅलेटस‌्सचा वापर करावा. यामुळे अन्य विकसित देशांप्रमाणे अापल्या देशातही कॅशलेस अर्थव्यवस्था निर्माण हाेण्यास मदत हाेईल, अशी अपेक्षाही पटेल यांनी व्यक्त केली. डेबिट कार्डाचा वापर वाढावा यासाठी व्यापाऱ्यांना ‘पाॅइंट अाॅफ सेल’ उपकरण उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती बँकांना करण्यात अाली अाहे. अाता परिस्थिती सुधारत असून बँक शाखा अाणि एटीएम केंद्रांच्या बाहेरील रांगा कमी हाेत अाहेत. तसेच बाजारही सुरळीत झाला असून नित्याेपयाेगी वस्तूंचा तुटवडा जाणवत नाही. नवीन नाेटांची मागणी पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँक अाणि सरकार प्रिंटिंग प्रेस पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करीत अाहेत, असेही पटेल म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...