आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलच्या टिवटिवाटानंतर पॉलिटिकल एक्स्प्रेस सुसाट; रंगले राजकीय टि्वट युद्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कॉमेडीविथ कपिल या शोमुळे देशभर लोकप्रिय असलेला हास्य कलाकार कपिल शर्मा याने मुंबई महापालिकेवर पाच लाखांच्या लाचेच्या आरोपाचे टि्वट केल्यानंतर महापालिकेतील शिवसेना-भाजप या सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली. राज्याच्या राजकारणात यामुळे एकच खळबळ उडाली. दिवसभर राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडला.

कपिलने माफी मागितल्यास त्याच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण होऊ देणार नाही, अशी धमकी मनसे आणि शिवसेनेने दिल्यानंतर मात्र आपण कोणत्याही पक्षाला दोषी धरलेले नसून केवळ काही व्यक्तींवर आपला आक्षेप अाहे, असे ट्विट रात्री करून कपिलने नरमाईची भूमिका घेतली.
कपिलच्या ट्विटनंतर लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव सांगा, उचित कारवाई करू, असे आवाहन करून आपली अब्रू वाचविण्याचा प्रयत्न महापालिकेने केला. एवढेच नव्हे, तर कपिल शर्माचे बांधकामच कसे अनधिकृत होते, हे दाखवून देत मनपा याप्रकरणी कशी निर्दोष आहे, हेही दाखवून देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. हेच का ते अच्छे दिन?, असा सवाल कपिल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्याने महापालिकेची पंचाईत झाली. कपिलच्या ट्विटची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी चौकशीच्या आदेशाचे रिट्विट केले. सेलिब्रिटीची जशी तत्काळ दखल घेतली तोच न्याय सामान्यांना का नाही, असा सवाल उपस्थित करत सर्वपक्षीयांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

कपिलच्या शोचे चित्रीकरण रोखू : मनसे
कपिलचे बांधकाम पाडू नये यासाठी लाच मागण्यात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही होते, असे टि्वट कपिलने केल्यानंतर दोन्ही पक्ष त्यांच्यावर तुटून पडले. शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी कपिलचा बोलविता धनी कोण आहे, हे तपासले पाहिजे, असे सांगितले. मनसेच्या चित्रपट शाखेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी कपिल शर्माने मनसेच्या कार्यकर्त्याचे नाव जाहीर करावे, अन्यथा माफी मागावी. तसेच त्याच्या कार्यक्रमाचे मुंबईत चित्रीकरण होऊ देणार नाही, असा इशाराही दिला.
बातम्या आणखी आहेत...