मुंबई - शिवसेनेशी युती तुटल्याचे दु:ख आहे. सध्या महाराष्ट्रात भाजपबद्दल सकारात्मक वातावरण असून स्वबळावर भाजपचेच सरकार येईल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते महाराष्ट्रात आले आहेत.
सोमवारी सकाळी मुंबईत भाजपच्या उमेदवारांचा प्रचार आटोपून संध्याकाळी पर्रीकर "स्ट्राँग लीडर अँड गुड गव्हर्नन्स' या परिसंवादात सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर
आपली मते स्पष्ट केली. ‘एका पक्षाचे सरकार यावे ही जनतेची इच्छा आहे. ज्या ठिकाणी आम्ही लढलो यापूर्वी नाही अशा अनेक मतदारसंघांत आमची संघटनात्मक यंत्रणा उभा राहू शकली नाही. अनेक ठिकाणी बूथ पातळीवरसुद्धा वाढीव ताकद लावावी लागते आहे. त्यामुळे बाहेरून आलेले नेते, कार्यकर्ते स्थानिक नेत्यांना मदत करत आहोत,’ असे ते म्हणाले.