आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संस्कारी बाबुजींच्या मुलावर Drunk & Drive प्रकरणी कारवाई, पोलिसांशी घातली हुज्जत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संस्कारी बाबुजी म्हणून प्रसिद्धी मिळवलेले बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्या मुलावर ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलिस कारवाई करत असताना शिवांगच्या मित्राने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर पोलिस ठाण्यातही त्याने धिंगाणा घातल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान याविषयी बोलताना अालोक नाथ म्हणाले माझा मुलगा मोठा आहे, तो त्याचे प्रकरण सांभाळू शकतो.
आलोक नाथ यांचा मुलगा शिवांग सोमवारी रात्री मित्रांबरोबर मुंबईच्या रसत्यांवर दारु पिऊन गाडी चालवत होता. एका पोलिसाने जेव्हा त्यांची गाडी अडवली तेव्हा शिवांग दारु प्यायलेला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. शिवांगनं गाडी न थांबवता पळण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला सांताक्रुझमध्ये पकडले. त्याचे काही मित्रही त्यावेळी त्याच्याबरोबर होते. पण चूक मान्य करण्याऐवजी आलोक नाथ यांचा मुलगा शिवांगच्या एका मित्राने पोलिसाबरोबर हुज्जत घातली. त्याचवेळी त्याठिकाणी असलेल्या एका वाहिनीने हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात टिपला. पोलिसांनी शिवांग याची कार जप्त केली असून ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी त्याच्यावर 2600 रुपयांचा दंड लावला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ.. त्यानंतर पाहा सोशल मीडियावरील आलोक नाथ यांच्या संस्कारासंबंधीचे जोक्स..
व्हिडिओ सौजन्य - इंडिया टिव्ही
बातम्या आणखी आहेत...