आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alphonso Mango Selling On Whatsapp News In Divya Marathi

Whatsapp वर मिळवा आता कोकणातील हापूस, करा ऑनलाईन खरेदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेतकऱ्यांच्या फायद्यासह देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे पीक म्हणजे फळांचा राजा ‘आंबा’. आता हा आंबाही चांगलाच हायटेक आणि स्मार्ट झाला आहे. म्हणून तर, आंबा बाजारपेठेसह ऑनलाईन आणि व्हॉट्सअॅपवरही दिसत आहे. विशेष म्हणजे आंबा पिकवणारे शेतकरी हे हायटेक फंडे वापरत आहेत.

अनेक स्वप्न मनाशी बाळगून कोकणातील शेतकरी मोठ्या आशेने आपला ‘आंबा’ मुंबईतील बाजारपेठेत विक्रिसाठी आणतो. मात्र, या आंबा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा अडथळा ठरताता ते घाऊक बाजारपेठेतील दलाल. कोकणातील आंबा शेतकरी दलालांच्या मध्यस्थीशिवाय मुंबईत आंबा विकूच शकत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. अनेक वर्षांपासून सुरु असेलली दलालांची ही मक्तेदारी रत्नागिरीतील सुभाष जाधव या शेतकऱ्याने मोडीत काढली आहे.
जाधव यांनी आपल्या मुलाच्या मदतीने ‘रत्नागिरी मँगो डॉट कॉम’(www.ratnagirimango.com) या नावाने ऑनलाईन मँगो शॉप सुरु करत आंबा विकणाऱ्या अनेक वेबसाईटन्सना टक्कर दिली आहे. या ऑनलाईन मँगो शॉपच्या माध्यमातून हा शेतकरी थेट ग्राहकांच्या घरी आंबा पोहचवत आहे. मागील तीन वर्षांसून ते हा उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या ऑनलाईन मँगो शॉपला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
www.ratnagirimango.com या ऑनलाईन मँगो शॉपसह यंदा जाधव व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही आंबा ग्राहकापर्यंत पोहचवत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धेच्या माध्यमातून आंबा देशाला मोठा प्रमाणात परकीय चलन मिळवून देतो. आंबा देशाला मोठा आर्थीक फायदा मिळवून देत असला तरी, याचे उत्पादन घेणारे शेतकरी एका ठराविक नफ्याच्या पलीकडे गेलेले नाहीत. यामुळे या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी आपण हे ऑनलाईन मँगो शॉप सुरु केले असून, अनेक शेतकरी या माध्यमातून आमच्यासह आंबा विकत असल्याचे सुभाष जाधव सांगतात.
विशेष म्हणजे जाधव हे ग्राहकांना पूर्णपणे नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबे उपलब्ध करुन देत आहेत. ते आंबे पिकवण्यासाठी कोणत्याही रसायनांचा वापर करत नाहीत. त्यांच्या या उपक्रमामुळे ग्राहकांना फक्त एका क्लिकवर रत्नागिरीचा अस्सल हापूस आंबा मिळवता येणार आहे. www.ratnagirimango.com सह ९८६७९३७४५६ या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करुन आंबा ऑर्डर करण्याची सुविधा जाधव यांनी उपब्ध करुन दिली आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, येथून तुम्ही खरेदी करू शकता ऑनलाईन हापूस आंबा