आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alternative Woman Commission Set Up In State, Nilam Gorhe Take Leade

राज्यात पर्यायी महिला आयोग स्थापन करणार,नीलम गो-हे यांचा पुढाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अत्याचारांचे प्रमाण कितीही वाढले तरी सरकार राज्यातील महिला आयोगाला गेल्या सात वर्षापासून अध्यक्ष देऊ शकलेले नाही. त्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय महिला आमदारांनी पर्यायी महिला आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी गुरुवारी दिली.


राज्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ होत आहे, तरीही राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असून आघाडी शासनाला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आता पर्यायी आयोग स्थापन करण्याची वेळ आली आहे. स्त्रीभ्रूण हत्यांच्या खटल्यांत पोलिस अनेक त्रुटी ठेवतात. पर्यायी आयोगामुळे अशा प्रकारांना आळा बसेल, असा दावाही गो-हे यांनी केला.


महिला अत्याचारांच्या घटनांत फॅक्ट फार्इंडिंग रिपोर्ट (वस्तुस्थिती शोध अहवाल) बनवणे, प्रलंबित खटल्यांना गती देण्याचे काम हा आयोग करेल. महिला अत्याचारांचे गुन्हे जाणीवपूर्वक अदखलपत्र नोंदवले जात आहेत. ‘मनोधैर्य योजना’ नेमकी कशी राबवायची याची माहिती एकाही पोलिस अधिका-याला नाही, अशी त्यांनी टीका केली. राज्यात महिला अत्याचारांचे 91 टक्के खटले प्रलंबित असून शिक्षेच्या प्रमाणात वाढ हवी. महिला अत्याचारविरोधी समितीने (निर्भया) महिलांच्या प्रश्नांच्या जागृतीसाठी राज्यातून गोळा केलेल्या 1 लाख सह्यांचे निवेदन पुढील आठवड्यात राज्यपालांना देणार असल्याची माहिती गो-हे यांनी दिली.


‘सरकार गंभीर नाहीच’
महिला सुरक्षेच्या नव्या कायद्याबाबत न्या. धर्माधिकारी समितीची गुरुवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला आरोग्य, गृह आणि महसूल, खात्याचे सचिव गैरहजर होते. यावरून महिलांच्या प्रश्नांवर शासन आणि प्रशासन गंभीर नसल्याचे दिसते, असे आमदार गो-हे म्हणाल्या.