आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सुपर 30’तून 28 हीरो; जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत अमन बन्सल अव्वल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थ्यांनी आपले जीवन घडवणारे गुरू आनंदकुमार यांना उचलून घेत हा आनंद साजरा केला. - Divya Marathi
विद्यार्थ्यांनी आपले जीवन घडवणारे गुरू आनंदकुमार यांना उचलून घेत हा आनंद साजरा केला.
मुंबई- देशातील सर्व नावाजलेल्या आयआयटीमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई (अॅडव्हान्स-२०१६) परीक्षेचा निकाल रविवारी सायंकाळी जाहीर झाला. या परीक्षेत राजस्थानचा अमन बन्सल याने देशात पहिला तर यमुनानगर येथील भावेश धिंग्रा याने दुसरा क्रमांक पटकावला. जयपूरमधीलच कुणाल गोयल याने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुलींत कोटा येथील रिया सिंहने अव्वल स्थान पटकावले.

देशात अनुसूचित जाती प्रवर्गातून नवी मुंबईतील चिन्मय आवळे, अनुसूचित जमाती प्रवर्गातून पुंगनूर येथील मुडे चैतन्य नाईक आणि ओबीसी प्रवर्गातून विजयवाडा येथील दुग्गनी जिविथेश यांनी त्या-त्या प्रवर्गांत देशात पहिला क्रमांक पटकावला. मुलींमध्ये कोटा येथील रिया सिंह ही देशात मुलींमध्ये पहिली आणि देशातील रँकमध्ये तिसरी आली.

जेईई अॅडव्हान्सच्या परीक्षेला देशभरातून लाख ५५ हजार ९४८ विद्यार्थ्यांनी नोदणी केली होती. यापैकी ३६ हजार ५६६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यात ३१ हजार ९९६ विद्यार्थी आणि हजार ५७० विद्यार्थिंनींचा समावेश आहे.

मागील वर्षांच्या तुलनेत यंदा पात्र विद्यार्थ्यांची संख्या १० हजाराहून अधिक वाढली असून या विद्यार्थ्यांचे मुंबईसह देशातील २३ आयआयटीमध्ये असलेल्या अभियांत्रिकी, तंत्रशास्त्र आणि इतर संबंधित चार ते पाच वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी हे प्रवेश निश्चित होतील.

गरीब कुटुंबातील होतकरू मुलांसाठी पाटण्यात आपल्या घरी मोफत क्लास चालवणारे आनंदकुमार यांच्या ‘सुपर-३०’ तील २८ विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरले.
बातम्या आणखी आहेत...