आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ambedkar Jayanti Celebrated With Joy And Enthusiasm

महामानवास अभिवादन करण्यासाठी लाखाें भीमसैनिकांची गर्दी, राष्ट्रवादीच्या नेत्यांची पाठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १२४ व्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यासाठी मंगळवारी दादर येथील चैत्यभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांसह हजारो भीमसैनिकांनी अलाेट गर्दी केली हाेती.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सकाळी नऊच्या सुमारास बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, दक्षिण मुंबईचे स्थानिक खासदार राहुल शेवाळे, माहिमचे स्थानिक आमदार सदा सरवणकर, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, उपमहापौर अलका केरकर, खासदार रामदास आठवले, तसेच मुंबई मनपा आयुक्त सीताराम कुंटे यांनीही अभिवादन केले.

या वेळी चैत्यभूमीवर छोटेखानी सभा पार पडली. त्यामध्ये सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार राहुल शेवाळे, खासदार रामदास आठवले व महापौर स्नेहल आंबेकर यांनी आपले विचार मांडले. बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाकडून भीमसैनिकांसाठी नागरी सेवा-सुविधांबाबत चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.

हेलिकाॅप्टरने पुष्पवृष्टी
- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या बाबासाहेबांवरील लोकराज्य विशेष अंकाचे प्रकाशनही करण्यात आले.
- रिपब्लिकन न्यूज पोर्टलचेही लोकार्पण.
- चैत्यभूमीवर दुपारी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी उपस्थित आंबेडकरी अनुयायांनी प्रचंड जल्लोष केला.
- राष्ट्रवादीचा एकही नेता चैत्यभूमीकडे िफरकला नाही. तसेच राजकुमार बडोले वगळता सरकारमधील इतर मंत्र्यांनी चैत्यभूमीकडे पाठ फिरवल्याचेच दिसून आले.
मंत्री निघाले लंडनला
बाबासाहेबांनी लंडनमध्ये वास्तव्य केलेल्या घराची खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे १७ एप्रिल रोजी लंडनचा दौऱ्यावर जाणार आहेत. लंडनमधील १० किंग हेन्री रोडवरील या घरात (१९२१- २२) बाबासाहेबांचे वास्तव्य होते. ही वास्तू अाता राज्य सरकार खरेदी करणार अाहे.

गुगल डुडलवर झळकले बाबासाहेब!
गुगलने विशेष डुडलद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. गुगल सर्चवरील ट्रेंडचे विश्लेषण केले असता गेले दशकभर भारतच नव्हे, अवघ्या जगभरातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्चमध्ये भरीव वाढ होत असल्याचे गुगलने म्हटले आहे.
05 लाखांवर हिट्स या डुडलला
ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाच्या गुगलवरील सर्वाधिक सर्चमध्ये बाबासाहेब तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महात्मा गांधी प्रथम, तर जवाहरलाल नेहरू दुसऱ्या स्थानी आहेत.
भारत, ब्रिटन, आयर्लंड, पोलंड, स्वीडन, अर्जेंटिना, चिली, पेरू या 08 देशांच्या गुगल होमपेजवर बाबासाहेब.
पुढे वाचा, आठवलेंची रॅली झोकात...