आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादरमधील आंबेडकर भवनावर अखेर बुलडोझर, माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांंनी स्थापन केलेल्या पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची दादर येथील जीर्ण इमारत संस्थेच्या ट्रस्टींनी गुपचूप शनिवारी पहाटे बुलडोझरने जमीनदोस्त केली. या घटनेची माहिती समजताच भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी संस्थेचे सल्लागार व राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यासह अज्ञात चारशे व्यक्तींवर गुन्हा दाखल केला.

आंबेडकर भवन जमीनदोस्त केल्याने राज्यात ठिकठिकाणी भारिपच्या कार्यकर्त्यांनी संस्थेच्या ट्रस्टींचा िनषेध केला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४४ मध्ये समाजाच्या उद्धारासाठी ही ट्रस्ट स्थापन केली होती. त्यासाठी दादर येथे अर्धा एकर जमीन खरेदी केली होती. येथेच भारत भूषण प्रिटींग प्रेस सुरू करण्यात आली. १९७३ मध्ये या जागी छोटेखानी इमारत बांधून ती सार्वजनिक कार्यक्रमासाठी आजपर्यंत वापरण्यात येत होती.

मुंबई महापालिकेने १९६७ मध्ये संस्थेच्या जागेवर शाळेचे आरक्षण टाकले. त्यामुळे ट्रस्टींना नवी इमारत बांधता आली नाही. नव्या ट्रस्टींचे या जागी ७० कोटी रु. खर्चून १७ मजली इमारत बांधण्याचे नियोजन आहे. मात्र, त्यास बाबासाहेबांचे नातू अॅड प्रकाश, भीमराव आणि आनंदराज यांचा सक्त िवरोध आहे.

महापालिकेने संस्थेस इमारत धोकादायक ठरल्याने ३० दिवसात पाडण्याची नोटीस काही दिवसांपूर्वी बजावली होती. परंतु िदवसा इमारत पाडायची तर आंबेडकर कुटुंबीयांचा िवरोध होणार. त्यामुळे ट्रस्टींनी गुपचूपणे शनिवारी पहाटे सध्याची इमारत जमीनदोस्त केली.

गायकवाड नायक आणि खलनायक
ट्रस्टचे सल्लगार आहेत राज्याचे माजी मुख्य सचिव आिण िवद्यमान मााहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड. त्यामुळे अॅड. प्रकाश आंबेडकर समर्थक भारिप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांनाच भवन पाडकाम प्रकरणी खलनायक ठरवले आहे, तर दुसरीकडे बाबासाहेबांचे स्वप्न गायकवाड यांच्यामुळेच साकार होत असल्याची प्रतिक्रिया आंबेडकरी समाजात आहे.
बातम्या आणखी आहेत...