आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधुदुर्ग - आंबोली घाटामध्ये वाळूचा ट्रक दरीत कोसळून चालकाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली घाटात वाळूचा गच्च भरलेला ट्रक हा दरीत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तर काल दुपारी ४ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात ट्रकचालक सागर बिर्जेचा मृत्यू झाला आहे. 
 
मालवणवरून हा ट्रक बेळगावला वाळू घेऊन जात असताना आंबोली घाटामध्ये हा ट्रक कोसळला. ट्रक चालवत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने घाटामध्ये असलेल्या संरक्षक कठड्यावरून खोल दरीत हा ट्रक कोसळला आहे. पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली मात्र खोल दरीत हा ट्रक कोसळल्याने ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. 

आंबोली घाटात गेल्या काही वर्षांपासून दरडी कोसळण्याच्या घटना आंबोली घाटात वाढल्या आहेत. आंबोली घाट हा सिंधुदुर्ग आणि बेळगावला जोडणारा घाट म्हणून ओळखला जातो.  तसेच या घाटाची परिस्थिती ही खूपच नाजूक आहे. या घाटाचा अरुंद रस्ता असल्यामुळे नेहमी अपघात असल्याचे आरोप केले जात आहेत. 
बातम्या आणखी आहेत...