आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

20 PHOTOS: आंबोलीचे धबधबे करतील आकर्षित, हिरवळीच्‍या पडाल प्रेमात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंबोली - पावसाळ्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीमध्‍ये पर्यटकांची गर्दी होत आहे. निसर्गाच्‍या सौंदर्याने मोहित करणा-या या पर्यटनस्‍थळी रविवारी पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. जोरदार पावसानंतर आंबोलीचे धबधबे वाहने सुरू झाले आहे. त्‍यामुळे येथे पर्यटकांची गर्दीही वाढत आहे. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला काही खास फाेटोंमधून आंबोली येथील निसर्ग सौंदर्य दाखवत आहोत.

रविवारी गर्दीचा विक्रम..
गेल्‍या रविवारी आंबोली येथे हजारो पर्यटकांची गर्दी होती. त्‍यामुळे पोलिसांची संख्‍याही कमी पडली. पर्यटकांच्‍या गर्दीमुळे आंबोली घाटात दोन ते तीन तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. गेले काही दिवसांपासून सुरू असलेल्‍या पावसामुळे येथील निसर्ग सौंदर्य खुलले आहे.
धबधब्यासह आंबोलीत इतरही पर्यटनस्‍थळं आहेत. त्‍यामुळे धबधब्यासह कावळेशेत, महादेवगड या पॉईंटवरही पर्यटकांची नेहमी वर्दळ पाहायला मिळते. कोल्हापूर, गोवा, मुंबई, पुणे, कर्नाटक यासह राज्‍यातील विविध जिल्‍ह्याती पर्यटक येथे भेट देतात.

बेळगांव व गोव्याला जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट होय. आंबोली हे पर्यटकांना खेचणा-या सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आंबोली घाटातून प्रवास करताना निसर्ग पर्यटनाचा आस्वाद पर्यटक मनमुराद घेतात. आभाळाशी स्पर्धा करणार्‍या टेकड्या, बारोमास हिरव्यागार असणार्‍या दर्‍या पावसाळ्यात तर अधिकच सुंदर दिसतात. पाहुया येथील सौंदर्य..
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, आंबोलीचे मनमोहक सौंदर्य..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...