आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने दाखवली पूरग्रस्तांची लाइफ, जोखीम पत्कारून असे जीवन जगतात भारतीय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुद्दुचेरीत पुराच्या पाण्यात चहा विकणारा एक मुलगा.. - Divya Marathi
पुद्दुचेरीत पुराच्या पाण्यात चहा विकणारा एक मुलगा..
मुंबई- देशातील अनेक राज्यात पूरस्थिती आहे. त्यात भारतातील पूरस्थिती हा विदेशी फोटोग्राफर्सचा आवडीचा विषय राहिला आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये आम्ही आपल्यासाठी अमेरिकन फोटोग्राफर स्टीव्ह मेकरी यांची फोटो सीरिज घेऊन आलो आहे. पूरस्थितीत भारतीय लोक किती जोखीम पत्करून जीवन जगतात, यावर स्टीव्ह यांनी कॅमेरा फिरवला आहे.

स्टीव्ह यांनी दाखवले 'कभी खुशी... कभी गम'
- पावसाळा हा जवळपास सगळ्यांचा आवडता ऋतू आहे. मात्र, हा पावसळा अनेकांच्या जीवावरही उठल्याचे आपण पाहिले आहे. स्टीव्ह यांनी देखील आपल्या फोटो सीरीजमधून 'कभी खुशी कभी गम' दाखवले आहे.
- मान्सूनमध्ये क्लिक केलेल्या फोटो सीरिजला स्टीव्ह यांनी 'लाइफ ब्रेथ ऑफ हाफ द वर्ल्ड' असे नाव दिले.
- फोटो सीरिजमध्ये देशातील विविध भागातील पूरस्थिती दर्शवली आहे. उद्‍धवस्त झालेले पीक आणि हताश झालेल्या शेतकर्‍याचे दु:ख स्टीव्ह यांनी दाखवले आहे.
- मुंबईतील पाऊस आणि पोरबंदरमधील पूरस्थिती वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
- या फोटो सीरिजमध्ये स्टीव्ह यांनी भारतासह अनेक देशांना भेटी दिल्या आहेत.

कोण आहे स्टीव्ह मेकरी?
- स्टीव्ह मेकरी हे अमेरिकन फोटो जर्नलिस्ट आहेत. अफगानी गर्ल कलेक्शन नामक फोटो बुकने त्यांना मेकरी यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली.  
- त्यांचे 'इंडिया स्टीव्ह मेकरी' नामक फोटो बुक देखील प्रकाशित झाले आहे.
- स्टीव्ह यांनी इराण-इराक युद्ध, गल्फ युद्ध, आणि अफगाण गृहयुद्ध कव्हर केले होते.
- त्यांना फोटोग्राफी आणि रिपोर्टिंगसाठी एक डझणपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
- मान्सून कॅमेर्‍यात कैद करण्‍याची कल्पना स्टीव्ह यांना 11 वर्षी मिळाली होती. 'लाइफ' मॅ‍गझिनमध्ये प्रकाशित झालेल्या 'इंडियन मान्सून'मध्ये त्यांनी एक फोटो पाहिला होता.
- स्टीव्ह यांनी काही वर्षे नॅशनल जियोग्राफीसाठीही काम केले होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... फोटोग्राफरने दाखवली पूरग्रस्तांची लाइफ दर्शवणारी स्टीव्ह मेकरी यांची फोटो सी‍रीज...
बातम्या आणखी आहेत...