आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Students Learning Yog And Music In India

भारतात शिकायचा योगा, अमेरिकेत कमवायचा पैसा अन् जगभर करायचा प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जर मनात एखादी बाब शिकायची इच्छा असेल तर मार्ग नक्कीच निघतो. मग त्यासाठी सात समुद्र पार करायची वेळ आली तरी हरकत नाही. अशीच बाब नुकतीच औरंगाबाद शहरात पाहायला मिळाली. अमेरिकेतील मिनिसोटा शहरात राहणारे येरो बेन्रुद, टुली आणि मेरीगोल्ड सध्या औरंगाबादेमध्ये योगा आणि संगीताचे प्रशिक्षण घेत आहेत. हे तिघेही मित्र आहेत तसेच समाजशास्त्राचे विद्यार्थी आहेत. याचबरोबर ते नोकरीही करतात. वर्षभर कमाई करायची आणि दरवर्षी नव्या देशात फिरायला जायचे असा त्यांचा खाक्या. सध्या हे तिघे भारतात आहेत व योगा, संगीताचे धडे घेत आहेत.
अमेरिकेत शिकवतात योगा-
चार वर्षापूर्वी येरोने योगाचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर अमेरिकेत परतल्यावर आपल्या मित्रांना व नातेवाईकांना त्याने योगा शिकवला. तो स्वत:ही रोज योगा करतो. तसेच तो रोज जेवायला पद्मासनावर बसतो. नाशकात योगाचे पुढील प्रशिक्षण घेऊन ते अमेरिकेत अधिकृत योगा प्रशिक्षण वर्ग सुरु करणार आहे.
भारतीय कुटुंबवत्सल्य-
येरो, टुली व मेरीगोल्ड हे तिघे जेव्हा भारतात येत होते तेव्हा त्यांना अमेरिकन गाईडनी भारताबाबत चुकीची व नकारात्मक माहिती दिली होती. मात्र तरीही ते जेव्हा भारतात परतले तेव्हा त्यांना त्याच्या उलटच अनुभव आला. या तिघांचे म्हणणे भारतीय लोक कुटुंबवत्सल्य आहेत. ते एकमेंकांची खूपच काळजी घेतात. कुटुंबातील हे बॉन्डिंग त्यांना फार अप्रुफ वाटते.
पुढे स्लाईडच्या माध्यमातून पाहा PHOTOS...