मुंबई - राज्यसभेची विचारणा झाल्यास
आपण त्याचा नक्की विचार करू, असे मत मि.परफेक्शनिस्ट
आमिर खान याने व्यक्त केले. मुंबईत रविवारी एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या कार्यक्रमात त्याने अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
सचिन तेंडुलकर, रेखा आणि इतरांप्रमाणे तुला राज्यसभेवर जाण्यास आवडेल का, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, ते काय करतात याबाबत मी बोलणे योग्य ठरणार नाही. समाजाला आपण काहीतरी देणे लागतो. त्यामुळेच जर आपल्याला राज्यसभेची िवचारणा झाली तर नक्कीच आपण विचार करू, असेही त्याने या वेळी सांिगतले.