आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amir Khan News In Marathi, PK Film, Hemant Patil, Divya Marathi

आमिर खानच्या वादग्रस्त ‘पीके’ विरोधात याचिका, सामाजिक कार्यकर्ते पाटलांची बंदीची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला आमिर खानचा ‘पीके’ चित्रपट आता पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात अडकला आहे. या चित्रपटावर तसेच त्याच्या पोस्टरवर बंदी घालण्याची मागणी करणारी एक याचिका सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मुंबईच्या सत्र न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या प्रदर्शनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नुकतेच जारी करण्यात आलेल्या पीकेच्या पहिल्या पोस्टरमध्ये बॉलीवूड अभिनेता आमिर खानला नग्नावस्थेत दाखवण्यात आले आहे. मागील कित्येक दिवसांपासून हे चित्रपट माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले आहे.
आमिर खान हा चांगला अभिनेता असून सत्यमेव जयतेसारख्या मालिकेच्या माध्यमातून त्याने समाजप्रबोधनाचे काम केले आहे. त्याने जनमानसात त्याची चांगली प्रतिमा तयार केली आहे. मात्र, पीकेतील त्याने दिलेले नग्न दृश्य लज्जास्पद असल्याचे पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे ही दृश्ये हटवण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

याचिकेत सेन्सॉर मंडळाचे अधिकारी, अभिनेता आमिर खान, पीकेचे निर्माता विधू विनोद चोप्रा आणि दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या नावांचा समावेश आहे. मंगळवारी याचिकेवर सुनावणी केली जाणार आहे. यापूर्वी मानवाधिकार आयोग आणि सामाजिक न्याय फ्रंटने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.ज्यांना हे पोस्टर आवडले नाही त्यांनी हा चित्रपट पाहू नये, असे न्यायालयाने त्या वेळी म्हटले होते.