आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित देशमुख यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव व लातूरचे आमदार अमित देशमुख यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. विलासराव देशमुख यांच्या अकाली निधनामुळे मराठवाड्यात न भरून येणारी मोठी राजकीय पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेक काँग्रेस नेत्यांमध्ये आहे. या भागात असलेला काँग्रेसचा जनाधार टिकवून ठेवायचा असेल तर अमित यांना मंत्रिपद देण्यात यावे, असा काँग्रेसमधील काही नेत्यांचा सूर आहे. मुख्यमंत्रीही यासाठी अनुकूल आहेत. काँग्रेसच्या कोट्याच्या तीन जागा रिक्त आहेत. यातील एक जागा अमित यांना देऊन मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
विलासरावांच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर, अमित यांनी दिला मुखाग्नी