आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहा गुरुवारी मुंबईत, प्रदेश भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - घाेटाळ्यांच्या अाराेपांत अडकलेले भाजपचे मंत्री व रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष अमित शहा गुरुवारी मुंबई दाै-यावर येत अाहेत. त्यामुळे प्रदेश भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग अाला अाहे.

महासंपर्क अभियानांतर्गत राज्यात नव्याने नोंद झालेल्या एक कोटी सदस्यांपर्यंत पोहाेचण्याच्या प्रयत्नात प्रदेश भाजपचे पदाधिकारी कितपत यशस्वी झाले आहेत, याचे मूल्यमापन करून या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा शहांकडून घेतला जाणार आहे. गुरुवारी वांद्रे परिसरातील रंगशारदा सभागृहात सकाळी नऊपासून संध्याकाळी सहापर्यंत भरगच्च बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीदरम्यान अमित शहा महाराष्ट्रासह गोवा आणि गुजरात या राज्यांमधील महासंपर्क अभियानाचाही आढावा घेणार आहेत. त्यासाठी या तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि महत्वाच्या मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती प्रदेश भाजपतर्फे देण्यात आली.