आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BMC निवडणुकीनंतर अमित शहा प्रथमच मुंबईत, संघाच्या निवडक नेत्यांसोबत बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईसह 10 महानगर पालिका, 25 जिल्हा परिषदांच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा प्रथमच मुंबईत आले होते. धावत्या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या निवडक पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतरचा त्यांचा हा पहिला मुंबई दौरा होता. शनिवारी पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहांनी संघाच्या नेत्यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. 
 
वरळीतील यशवंत भुवनमध्ये झालेल्या बैठकीला मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह    संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशी, कृष्ण गोपाल उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर शहा लागलीच दिल्लीला रवाना झाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...