आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियंस ट्रॉफी चालेल, पण भारत-पाकमध्ये दुहेरी क्रिकेट सिरीज शक्यच नाही -अमित शहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
मुंबई - भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघांमध्ये कुठलीही दुहेरी सिरीज अशक्य असल्याची स्पष्टोक्ती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी केली. भारत आणि पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होत राहतील. चॅम्पियंस ट्रॉफी हा त्याचाच एक भाग आहे. मात्र, भारत पाकिस्तानला जाणार नाही आणि पाकिस्तानी क्रिकेट संघ भारतात येणार नाही. महाराष्ट्र दौऱ्यावर असताना शहा यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली आहे. 
 
- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शहा म्हणाले, आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा उल्लेख केला होता. यात कुठल्याही प्रकारचा फायदा मिळवण्याचा हेतू नाही. सरकार चर्चा करणार आणि त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. 
 
- महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. अशा प्रकारच्या घोषणा करणाऱ्या राज्य सरकारांनीच कर्जमाफीची तरतूद करावी असे शहा यांनी सांगितले. विशेष म्हणजे, यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही कर्जमाफीवर राज्यांना केंद्र सरकार काहीच मदत करणार नाही असे स्पष्ट केले आहे. 
 
- यासोबतच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारावर सध्या चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतरच उमेदवाराच्या नावाचा निष्कर्श काढला जाणार आहे असे शहा यांनी म्हटले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...