आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या यशात रिपाइंचा मोठा वाटा, मुख्यमंत्र्यांनी शहांकडे केले आठवलेंचे कौतुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची आज वर्षा बंगल्यावर भेट झाली. केंद्रात मोदी सरकारला तीन वर्ष पुर्ण झाल्याच्या अनुषंघाने यावेळी आठवले यांनी अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देउन अभिनंदन केले. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची मोठी मदत झाल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अमित शाह यांच्याकडे आठवलेंचे कौतुक केले. 

यावेळी झालेल्या चर्चेत अमित शाह यांनी केंद्र सरकारबद्दल दलित मागासवर्गीय जनतेत काय भावना आहेत याबद्दल रामदास आठवलेंकडे विचारणा केली. या अनुषंगाने उभय नेत्यांत झालेल्या दीर्घ चर्चेत रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अनेक चांगले निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे आंबेडकरी जनतेत मोदी सरकार बद्दल चांगले समाधानकारक वातावरण असल्याचे सांगितले.

तसेच 125 वी भीमजयंती भव्य प्रमाणात सरकारने साजरी करून 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा केला. तसेच आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचे प्रधानमंत्र्यांनी वेळोवेळी जाहीर केले आहे. इंदुमिलचा निर्णय झाला असल्याने आंबेडकरी जनतेत समस्त दलित मागसवर्गीयांमध्ये केंद्र सरकार बद्दल चांगले वातावरण असल्याचे मत यावेळी रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...