आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुका झाल्याच तर भाजपच जिंकेल, आता आमचे प्रत्येक जागेवर लक्ष- अमित शहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्याच तर भाजपच जिंकेल. आता आम्ही ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला असून कोण किती जागा लढवणार हे नंतर ठरेल, पण आमच्या पक्षाने प्रत्येक जागेवर लक्ष केंद्रित केले आहे. मैदान सोडून तर जाता येणार नाही, असा सूचक इशारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसह घटक पक्षांना दिला. खास करून सत्तेत राहून विरोधकांची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेलाही शहांनी यानिमित्ताने डिवचले.
 
अमित शहा हे तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. पक्ष विस्ताराच्या नावाखाली दीड महिन्यापासून भाजपची राज्यभर मध्यावधीच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. तब्बल हजार बूथच्या मार्गदर्शनाखाली विस्ताराचे काम केलेे जात असून शिवसेनेसह विरोधकांच्या जागांवर भाजपची काय स्थिती याची माहिती घेतली जात आहे. हा सर्व प्रकार म्हणजे मध्यावधीचीच तयारी असल्याचे स्पष्ट दिसते. विशेष म्हणजे सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा शिवसेना वारंवार देत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहा यांचा इशारा महत्त्वाचा मानला जात आहे.
 
आमचे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मध्यावधीसाठी आम्ही तयार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मी हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण पक्ष म्हणून विचार करताना तुम्हाला नेहमी सज्ज असावे लागते, असे सांगत असताना शहा यांनी हे सरकार पाच वर्षे चालेल असा सूरही लावला. सरकार चांगले काम करत असल्याचे सांगताना शेतकरी आंदोलनाबाबत सरकारची भूमिका ही संवेदनशील होती हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
 
बातम्या आणखी आहेत...