आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Becomes The Brand Ambassador For Fruit Products

बिग बी विकणार फळ; अमिताभ बच्चन बनले महाराष्ट्राचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसडर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - अमिताभ यांच्या ट्वीटर अकाऊंटवरील फोटो

मुंबई -
गुजरातचे अ‍ॅम्बेसेडरपद भूषविल्यानंतर बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन आता महाराष्ट्राचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसडर होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अमिताभ बच्चन यांना ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर बनवले आहे. विशेष म्हणजे बिगबी यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कोणतेही मानधन घेणार नाहीत. बिगबींनी या संदर्भातील माहिती ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. सोबतच त्यांनी यासाठी केलेल्या फोटोशुटचे फोटोही येथे टाकले आहेत.

यासंदर्भात केंद्रीय फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "अमिताभ यांनी महाराष्ट्राच्या फलोत्पादनाचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडरचे पद स्वीकारले आहे. मला हे काम करून आनंदच होईल, मात्र या कामासाठी मी कोणतेही मानधन घेणार नाही अशा आशयाचे पत्र अमिताभ यांनी महाराष्ट्र सरकारला लिहिले आहे."

"फळांच्या अनेक जातींचे उत्पादन करण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे हे मला माहित नव्हते. मला ही जाहिरात करण्यात मनापासून आनंद होत आहे," अशा आशयाचे ट्वीट करून अमिताभ यांनी या संदर्भातील माहिती दिली.
पुढील स्लाईडमध्ये या फोटोशुटचे इतर फोटो....