आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan ,jay In Truoble Due To Green Moll Investment

ग्रीन झोन मॉलमधील गुंतवणुकीवरून अमिताभ बच्चन, जया अडचणीत !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बृहन्मुंबई पालिकेने हरित पट्ट्याच्या जागी मॉल उभारण्यास परवानगी दिल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे हा मॉल उभारत असलेल्या कंपनीमध्ये बिग बी अमिताभ बच्चन व त्यांच्या पत्नी खासदार जया बच्चन यांच्या नावे गुंतवणूक असल्याचा आरोप माजी सनदी अधिकारी वाय. पी. आणि आभा सिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

या घोटाळ्यात महापालिका प्रशासन, राजकारणी आणि कॉर्पोरेटर्स गुंतल्याचा आरोपही सिंह यांनी केला. एचडीआयएल आणि एक्सटेसी रिअ‍ॅलिटी यांचा अंधेरी येथे 30 एकरांचा प्लॉट होता. त्याजागी मेट्रो कार शेड प्रकल्प उभारला जात आहे. त्यामुळे त्यातील काही जागा या दोन्ही कंपन्यांना मिळाली होती. मात्र, या प्लॉटच्या चारही बाजूंनी 30 मीटर पट्ट्यात केवळ वृक्षारोपण करावे, अशी अट नगरविकास खात्याने घातली होती. पालिकेच्या आराखड्यातही हरित पट्ट्याची सक्ती कायम होती. त्यानंतर नियम डावलून पालिकेनेच हरित पट्ट्यात बांधकाम करण्यास परवानगी दिल्याचे सिंह यांचे म्हणणे आहे.

बच्चन यांचे दहा कोटी
एचडीआयएल आणि एक्सटेसी कंपन्यांना अमिताभ आणि जया बच्चन यांनी 10 कोटी रुपये कर्जाऊ दिले आहेत. त्यामुळे याबाबत अमिताभ यांनीही याबाबत खुलासा करावा, अशी मागणी वाय.पी. सिंह केली आहे.