आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Named Maharashtra’s Horticulture Ambassador

प्रयत्न ‘फळा’ला; बिग बी अखेर राज्याचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेते अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्र फलोत्पादन विभागाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. रविवारी त्यांनी ट्विट करून त्याची घोषणा केली. केशरी रंगाचा फेटा व नेहरू शर्ट अशा मराठमोळ्या लूकमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील फळांची जाहिरात करणारा पहिला फोटोही ट्विट केला. राज्याचे फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील फळांचे देश-विदेशात ब्रँडिंग करण्याचा निर्णय घेत अमिताभ यांच्याकडे ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदाचा प्रस्तावही पाठविला होता. अमिताभ यांनीही सुरुवातीला या प्रस्तावाला होकार दिला. मात्र नंतरच्या काळात काही कारणामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती.
आंबा, अंजीर, सीताफळात राज्य अग्रेसर
द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन व निर्यात यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. आंबा, कांदा, केळी, अंजीर, सीताफळ व स्ट्रॉबेरी उत्पादनात राज्य अग्रेसर आहे.

शंकानिरसनानंतरच स्वीकारले पद
काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे फलोत्पादन क्षेत्राबाबतच्या प्रश्नांची जंत्रीच मागवली होती. सर्व शंकांच्या समाधानानंतर अमिताभ यांनी ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदाची जबाबदारी स्वीकारली.
20 लाख हेक्टर क्षेत्रात राज्यात अनेक ठिकाणी विविध फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते.
फलोत्पादनात महाराष्ट्र नंबर वन असल्याचे माहीत नव्हते. विभागाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी काम करताना अतिशय आनंद होत आहे.
- अमिताभ
गुजरात टुरिझमचेही दूत : अमिताभ बच्चन हे गुजरात पर्यटन विभागाचे अ‍ॅम्बेसेडर आहेत. याआधी त्यांनी भारत पोलिओमुक्त अभियानातही सहभाग नोंदवला होता.