आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Twitter Followers Number Go 1.5 Crores

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडियाचा ‘शहेनशहा’, ट्विटरवर दीड कोटी फाॅलाेअर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमिताभ बच्चन.... बाॅलीवूडचा शहेनशहा ! वयाची सत्तरी पार केल्यानंतरही आज जेव्हा तो पडद्यावर येतो तेव्हा नवे सुपरस्टार्सही फिके पडतात.. अाताचा ‘पिकू’ आठवा. नव्या दमाच्या इरफान खान, दीपिका पदुकोणच्या समोर टक्कर देत अमिताभ अभिनयाचे रंग खुलवतो तेव्हा कडक सॅल्यूटच मारावासा वाटतो! चार दशके भारतीयांच्या तनामनावर गारूड करणारा अमिताभ नावाचा अवलिया सोशल मीडियातही ‘शहेनशहा’ ठरला आहे. आज `ट्विटर'वर अमिताभच्या फॉलोअर्सची संख्या दीड कोटींवर गेली असून बाॅलीवूडसाठी हा नवा विक्रम ठरलाय!

दस्तुरखुद्द अमिताभनेच टि्वट करून ही माहिती दिली आहे. ‘आपण कुठला सिनेमा करणार आहोत, मी काय वाचतो, मला कुठली ठिकाणे आवडतात. खाण्यासाठी चांगली हाॅटेल्स कुठली अाणि कुठली डिश खावी’ याची माहिती अमिताभ ट्विटरवरून चाहत्यांना देत असतो. ती वाचण्यासाठी फॉलोअरच्या अक्षरश: उड्या पडतात... या शिवाय देशातील घटनांविषयीही बिग बी आपले रोखठोक मत व्यक्त करत असतात. काही दिवसांपूर्वी मुंबईत शूटिंग करत असताना अमिताभने गोळीबाराच्या घटनेची माहितीही ट्विटरवरून दिली. तो ज्या ठिकाणी शूटिंग करत होता, तेथून काही अंतरावरच एका व्यक्तीवर हल्ला झाला होता. ही माहिती देताच आपल्या लाडक्या अमिताभला काही झालेले नाही ना, अशी चिंताही त्याच्या फॉलोअरनी व्यक्त केली हाेती.
अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांमध्ये दिग्गजांचा समावेश

पुढे वाचा, इतर ताऱ्यांचे फाॅलाेअर्स