आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Will Be Chief Guest Of Balasaheb\'s Brith Universary

बाळासाहेबांच्या जयंतीला अमिताभ प्रमुख पाहुणा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी (23 जानेवारी) बृहन्मुंबई पालिकेने आयोजित केलेले कार्यक्रमास बिग बी अमिताभ बच्चन यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पालिकेच्या ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या विस्ताराचा शुभारंभ बच्चन यांच्या हस्ते होणार आहे. बुधवारी दादर येथे होणा-या या कार्यक्रमास शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे तसेच मुंबईचे महापौर सुनील प्रभू उपस्थित असणार आहेत.

बृहन्मुंबई पालिका शाळांतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘व्हर्च्युअल क्लासरुम’चा प्रयोग राबवत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना नामवंत शिक्षकांचे लाईव्ह मार्गदर्शन करण्यात येते. हा प्रयोग सध्या 80 शाळांमध्ये राबवण्यात येतो. या प्रकल्पाचा विस्तार करण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्याचे उद्घाटन 23 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या विस्ताराचे उद्घाटन दादर येथील पालिकेच्या स्टुडिओत होणार असल्याची माहिती महापौर सुनील प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.