आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabha & Jaya Bacchan Invested Money Ilegal Shopping Mall

जया व अमिताभची बेकायदेशीर शॉपिंग मॉलमध्ये गुंतवणूक- वाय. पी. सिंगांचा आरोप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी खासदार जया बच्चन यांनी मुंबईत 'ग्रीन झोन'मधील जागेत अवैध कमर्शियल बांधकामात पैसा गुंतवल्याचा गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते वाय. पी. सिंग यांनी केला आहे.

सिंग यांनी याबाबत आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन बच्चन कुटुंबियांवर आरोप केले. सिंग म्हणाले, अमिताभ आणि जया बच्चन यांनी मुंबईतील एका ग्रीन झोनमधील जागेत कमर्शियल बांधकामात पैसे गुंतवले असून त्या जागेवर एक शॉपिंग मॉल उभा राहत आहे. तसेच ज्या जागेत ही संपूर्ण मोठी इमारत उभारली जात आहे ते बांधकाम बेकायदेशीर आहे. अंधेरीतील ज्या जागेत फक्त झाडे लावता येऊ शकतात त्या जागेत एक्सटेली ही कंपनी बांधकाम करीत आहे. सिंग यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळवली आहे.

सिंग यांनी सांगितले की, जया बच्चन यांचे पाच कोटींपेक्षा जास्त तर, अमिताभ बच्चन यांनी 2.5 कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कमेची गुंतवणूक या शॉपिंग मॉलमध्ये केली आहे. तसेच जया बच्चन यांनी या गुंतवणुकीची माहितीही निवडणुकीचा अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रातही माहिती दिली आहे. दरम्यान, शॉपिंग मॉलची जागा ग्रीन झोनमध्ये आहे याची माहिती बच्चन कुटुंबियांना आहे की नाही याची आपल्याला माहिती नाही. मात्र आपण याविरोधात मुंबई महानगरपालिका, राज्य सरकारकडे तक्रार करणार असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.