आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाटक संहितेच्या प्री-सेन्सॉरशिपला अमोल पालेकरांचे आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नाट्यसंहितेची प्री-सेन्सॉरशिप अनिवार्य करण्याच्या नव्या नियमाला ज्येष्ठ रंगकर्मी चित्रपट निर्माते-अभिनेते अमोल पालेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

यंदा मार्चमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नाटकाच्या संहितेची प्री-सेन्सॉरशिप अनिवार्य नसल्याचे राज्य सरकारने मागच्या महिन्यात न्यायालयात तोंडी सांगितले होते. त्यावर न्यायालयाने लेखी शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी त्यासाठी वेळ मागितला होता. एकीकडे सरकार प्रि- सेन्सॉरशिप बंधनकारक नसल्याचे केवळ तोंडी सांगत आहे. मात्र सरकारच्याच रंगमंच परीनिरीक्षण मंडळाने या अधिसूचनेवर आता आक्षेप घेतला असल्याचे अमोल पालेकरांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
बातम्या आणखी आहेत...