आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमाेल यादवांच्या स्वदेशी विमानाची नाेंदणी प्रक्रिया पूर्ण! तपासणीनंतर उड्डाणाची संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- घराच्या छतावर भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवणारे पायलट अमाेल यादव यांच्या सहाअासनी विमानाला डीजीसीएने नाेंदणी प्रमाणपत्र दिले अाहे. तब्बल सहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर विमान नाेंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने त्यांच्या विमानाला अाता परमिट टू फ्लाय म्हणजेच विमान उडवण्याचा परवाना मिळणार अाहे. त्यामुळे अाता अमाेल यादव यांचे भारतीय बनावटीचे विमान अाकाशात झेपावण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण हाेणार अाहे.


विमानाला डीजीसीएची नाेंदणी मिळण्यासाठी अमाेल यादव यांनी २०११ मध्ये अर्ज केला हाेता. परंतु लालफितीच्या कारभारात अडकल्याने नियमात असूनही डीजीसीएकडे ही नाेंदणी रखडली हाेती.  अाता मात्र विमानाच्या चाचण्या घेण्यासाठी कायदेशीर परवानगी मिळाली अाहे. यादव यांना शुक्रवारी डीजीसीएकडून प्रमाणपत्र मिळाले. त्याबद्दल यादव यांनी साेमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अाभार मानले अाहेत.


 यादव म्हणाले की, तब्बल सहा वर्षांच्या अथक पाठपुराव्यानंतर डीजीसीएने अापल्या विमानाची नाेंदणी केल्यामुळे एक माेठा अडथळा दूर झाला अाहे. 


सध्या विमान उड्डाणाचा परवाना हाती नसल्याने शिर्डी किंवा अन्य छाेट्या विमानतळावर रस्तेमार्गे विमान घेऊन जावे लागणार अाहे. त्यानंतर उड्डाणाची चाचणी हाेईल. मेक इन इंडिया कार्यक्रमात हे विमान ठेवले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यादव यांच्या अडचणी लक्षात अाल्या. फडणवीस यांनी अमोलच्या विनंतीवरून त्यांना पालघर जिल्ह्यात विमान निर्मिती कारखाना उभारण्यासाठी १५७ एकर जमीन देण्याची घोषणा केली होती.मुख्यमंत्र्यांनी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बाेलावले असता त्यांनी नियमात तरतूद नसल्याचे कारण सांगितले. अखेर मुख्यमंत्र्यांनी स्वत: पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी चार वेळा चर्चा करून पत्रव्यवहार केला. विमाने अापल्याच देशात बनल्यास परकीय चलनाची माेठ्या प्रमाणावर बचत हाेईल. विमाने बनवण्याची क्षमता अापल्याकडे असली तरी नाेंदणी हाेत नसल्याने विमाने बनवण्याचे धाडस काेणी करत नाही. परंतु अाता मात्र हा मार्ग माेकळा झाला अाहे.


पर्रीकरांनी केले होते कौतुक 
फेब्रुवारी २०१६ मध्ये मुंबईत आयोजित मेक इन इंडिया या कार्यक्रमात अमोलने हे १० फूट ८ इंच अाकाराचे विमान ठेवले होते. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमोलचे कौतुक केले होते.

 

तपासणीनंतर मिळेल परवाना
डीजीसीए विमानाची तपासणी करू शकते. या तपासणीत काही त्रुटी अाढळल्यास त्या दूर करण्यात येतील. त्यानंतर डीजीसीएकडून राइट टू फ्लाय परवाना दिला जाईल. त्यानंतर विमान उड्डाणाचा मार्ग खऱ्या अर्थाने माेकळा हाेऊ शकेल. येत्या दहा दिवसात डीजीसीएचे अधिकारी विमानाची तांत्रिक तपासणी करतील.

 

मुख्यमंत्री, पंतप्रधानांमुळे, स्वप्न साकार : यादव  
पंतप्रधान नरेंद्र माेदी अाणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे अापले स्वप्न साकारू शकले. त्यामुळे या नव्या विमानाची नाेंदणी ‘व्हीटी एनएमडी’ अशी केली असल्याचे अमाेल यादव यांनी सांगितले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती....

बातम्या आणखी आहेत...