आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनाला चालना: मुंबई- कोकण किनारपट्टीलगत समुद्रावर धावणार बस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्राला नैसर्गिक सौंदर्यांचे मोठी अशी देणगी लाभली आहे. या देणगीचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न आता पर्यटन विभागाने केला आहे. त्याताच भाग म्हणून मुंबई ते कोकण अशी 700 किलोमीटर लांबीचा किनारपट्टीलगत समुद्रातून धावणारी बस सुरु करण्याच्या तयारीत आहे.आता तुम्ही एकदा बसमध्ये चढलात की ही बसच समुद्रावर चालू लागणार आहे. त्यामुळे जेम्स बॉण्डच्या चित्रपटातील हे दृश्य मुंबईत लवकरच दिसणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन महामंडळ आता समुद्राच्या पाण्यावर धावणारी बस (ऍम्फिबियन बस) योजना राबविण्याच्या तयारीत आहे. समुद्री पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी ‘एमटीडीसी’ आणि ‘मेहेर कंपनी’च्या वतीने जुहूत काल देशातील पहिल्यावहिल्या सी- प्लेन सेवेचा शुभारंभ अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मुळीक यांच्या हस्ते झाला. त्यानंतर झालेल्या भाषणात एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील यांनी ही माहिती दिली.
पाटील म्हणाले की, खासगी प्रायोजकांच्या आम्ही शोधात आहोत. ही समुद्री बससेवा जगात अनेक देशांत चालते. शिवाय यासाठी वेगळे इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचा खर्च लागत नाही. त्यामुळे तशी ही सेवा किफायतशीर आहे. मात्र, रस्ते व समुद्राच्या पाण्यात अशा दोन्ही ठिकाणी चालणार्‍या बसेससाठी समुद्रात उताराच्या जेटी उभाराव्या लागतील. गिरगावच्या समुद्रातही तरंगणार्‍या जेटी अशा बसेससाठी उभारता येतील. जेव्हा गरज नसेल त्यावेळी जेटी काढतासुद्धा येतात. त्यामुळे समुद्री पर्यटनासाठी हा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.