आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amrit Campaign In Aurangabad, Jalna With Eight Cities In Maharashtra

औरंगाबाद, जालन्यासह मराठवाड्यातील आठ शहरांचा ‘अमृत’ योग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई; केंद्राच्या अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) या अभियानाच्या राज्यात अंमलबजावणीचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अभियानात मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, परभणी, लातूर, उदगीर, उस्मानाबाद या ८ शहरांसह राज्यातील ४३ शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
शहरात प्रत्येक घरासाठी पाणीपुरवठा, मलनिस्सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था, मोकळ्या जागा, हरित क्षेत्रे, परिवहन व्यवस्था यात सुधारणा करणे या उद्देशाने हे अभियान आहे. केंद्राने देशात ५०० शहरांचा यात समावेश केला आहे.
पाच वर्षे हे अभियान राबवण्यात येईल. इतर शहरांत अहमदनगर, अमरावती, पुणे व पिंपरी-चिंचवड, नाशिक व मालेगाव, जळगाव, भुसावळ, धुळे, नंदुरबार, सोलापूर, बार्शी, कोल्हापूर, इचलकरंजी, सातारा, सांगली आहेत. त्यासाठी केंद्राकडून यंदा एक हजार तीन कोटी निधी मिळणार आहे. त्यादृष्टीने राज्य उच्चाधिकार समिती, तांत्रिक समिती, जिल्हास्तर आढावा व संनियंत्रण समिती आणि सचिव यांना राज्य अभियान संचालक म्हणून प्राधिकृत करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

राज्यातील या शहरांचाही समावेश :अचलपूर, वर्धा, हिंगणघाट, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, नागपूर, ठाणे, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर, वसई-विरार.