आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवगडच्या संग्रहालयात अमृता खानविलकर, अंकुशचे मेणाचे पुतळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आपल्या नृत्य व सौंदर्याने घायाळ करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर व डॅशिंग अभिनेता अंकुश चौधरी यांचे हुबेहूब दिसणारे मेणाचे पुतळे शिल्पकार सुनील कुंदलूर यांच्या लोणावळा व देवगड येथील वॅक्स म्युझियममध्ये ठेवले जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड येथे वॅक्स म्युझियम सुरू झाले असून या कलाकारांचे मेणाचे पुतळे पाहणे हे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरणार आहेत. सुनील कुंदलूर यांनी वॅक्स म्युझियम देवगडमध्ये सुरू करावे यासाठी आमदार नितेश राणे यांनी प्रोत्साहन दिले होते.

मराठी चित्रपटसृष्टीतील अंकुश चौधरी व अमृता खानविलकर हे युवा वर्गात अत्यंत लोकप्रिय आहेत. अंकुशच्या अभिनयाने सगळ्यांच्या मनावर भुरळ घातली आहे, तर अमृता खानविलकर ही तिच्या स्टाइलसाठी तरुणांत लोकप्रिय आहे. त्यामुळे दोघांचे मेणाचे पुतळे देवगड व लोणावळा येथील वॅक्स म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहेत.  मादाम तुसाद हे जगातील प्रसिद्ध मेणाचे पुतळे बनवणारे पहिले संग्रहालय आहे. परंतु हे पाहण्यासाठी पर्यटकांना लंडन किंवा दिल्लीला जाणे शक्य होत नाही. ही गोष्ट कुंदलूर यांनी हेरली. मूळ केरळच्या असलेल्या सुनील यांनी मेणाच्या पुतळ्यांचे  संग्रहालय सुरू करण्याचे ठरवले. २००० मध्ये त्यांनी लोणावळ्यात पहिले संग्रहालय उघडले. त्यात अनेक नामवंत कलाकारांचे आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे मेणाचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. या संग्रहालयाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी या संग्रहालयाची कोची येथे दुसरी शाखा उघडली व नंतर असेच म्युझियम देवगडला सुरू केले.
 
बातम्या आणखी आहेत...