मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फॅशन आणि लाईफस्टाईल दुनियेत प्रसिद्ध असलेल्या SAVVY या मॅगझीनच्या कव्हर पेजवर स्थान देण्यात आले आहे. 16 जूनला प्रकाशित होणा-या या मगॅझीनच्या नव्या अंकाचे प्रकाशन खुद्द अमृता यांच्याच हस्ते होणार आहे. व्यवसायाने एक बॅंकर असलेल्या अमृता एक क्लासिकल सिंगर आहेत. काही दिवसापूर्वीच त्यांनी बॉलिवूडमध्ये त्यांनी डेब्यू केला होता. आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या पत्नीने नोकरी करण्याचा विचार केला नव्हता. मात्र अमृता फडणवीस त्याला अपवाद ठरल्या. त्यामुळेच savvy ने त्यांना कव्हर पेजवर स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉक्टरची मुलगी आहे अमृता...
- अमृता नागपूरमधील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चारू रानडे आणि नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शरद रानडे यांची मुलगी आहेत.
- देवेंद्र यांचे जवळचे मित्र शैलेय जोगळेकर सांगतात की, देवेंद्र आणि अमृताची मुलाखत देवेंद्र यांच्याच घरी झाली होती.
- दोघांनी सुमारे तासभर चर्चा केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. देवेंद्र आणि अमृता यांना दिविजा नावाची मुलगी आहे.
बॉलिवुडमध्ये नुकताच केला डेब्यू
- अमृता फडणवीस शास्त्रीय गायिका आहेत. बॅंकिंग क्षेत्रातील 9-10 तासाची नोकरी करून सुद्धा त्या आताही नियमित त्या रियाज करतात.
- त्या सध्या मुंबईत अॅक्सिस बॅंकेत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत.
- अमृताने काही दिवसापूर्वी आलेल्या 'जय गंगाजल' मध्ये एक गाणे गायले होते. याद्वारे अमृतांनी बॉलिवुडमध्ये डेब्यू केला होता.
- अमृत अनेक फॅशन शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. एका इव्हेंटमध्ये त्या शो स्टॉपर म्हणून सहभागी झाल्या होत्या.
एका बाबांमुळे आल्या होत्या अडचणीत...
- अमृता फडणवीस यांना एका स्वयंघोषित बाबांनी हातचलाखी दाखवून मंगळसूत्र दिल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती.
- राज्यात एकीकडे अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी होत असताना दुसरीकडे चक्क मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसमोर भोंदूगिरी झाल्याने त्या वादात सापडल्या होत्या.
दिग्विजय सिंहांनी केला होता आरोप...
- मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील एसआरए (झोपडपट्टी पुनर्विकास) विकासकांना अॅक्सिस बँकेच्या केवळ वरळी शाखेतच अकाउंट उघडायला सांगितले असल्याचा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय यांनी केला होता.
- मिसेस फडणवीस अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा आहेत. अॅक्सिस बँकेसारख्या प्रायव्हेट बँकेला मोठा आर्थिक लाभ झाला. ही वशिलेबाजीची हद्द आहे.’ असे दिग्विजय यांनी म्हटले होते.
- दिग्विजय यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्यानंतर त्यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली होती.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, अमृता यांची निवडक छायाचित्रे....