आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amul Pattern Have In Maharashtra Agriculture Minister Pawar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमूल पॅटर्न महाराष्ट्रात हवा - कृषिमंत्री पवार यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दुग्धोत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी महाराष्ट्रात एकाच ब्रँडने दूध विक्रीची गरज असल्याचे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. अमूल डेअरीने ज्याप्रमाणे दुधाचे मार्केटिंग केले आहे, त्याचप्रमाणे राज्यात दुधाचे मार्केटिंग होणे आवश्यक आहे. या बाबतीत आपण गुजरातच्या मागे असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
अमूलच्या हरियाणातील पाच लाख लिटर क्षमतेच्या डेअरीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले त्या वेळी त्यांनी अमूलच्या दूध विक्री व्यवस्थापनाचे कौतुक केले. ते म्हणाले, गुजरातमध्ये सर्व सहकारी दूध संस्था अमूलला दूध देतात. महाराष्ट्रात याउलट स्थिती आहे. येथे गोकुळ, वारणा आणि आरे असे अनेक ब्रँड आहेत. महाराष्ट्रात याबाबतच्या सर्व पायाभूत सुविधा उत्तम आहेत. मात्र, उत्पादन अत्यंत कमी आहे. अमूलने मात्र पंजाब तसेच हरियाणातही आपले जाळे विस्तारले आहे.

भीषण दुष्काळ अन् दूध व्यवसाय
महाराष्ट्राच्या मराठवाडा भागात 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ असल्याचे पवार यांनी सांगितले. 72 च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेवर 45 लाख मजूर होते. यंदा मात्र या कामावर तीन लाख मजूर आहेत. दूध उत्पादक संघांमुळे हा फरक पडला असून हा व्यवसाय नीट जपण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.