आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमूल दूध प्रकल्प राज्यात सुरू होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमूल ब्रँड नेमने दूध व दुग्धजन्य पदार्थ विकणारी गुजरात सहकारी दूध विपणन फेडरेशन (जीएसएमएफए) पुढील आर्थिक वर्षात ५,००० कोटी रुपये गुंतवणूक करून देशभरात दहा दूध प्रक्रिया उद्योग सुरू करणार आहे. त्यात महाराष्ट्रतील एका प्रकल्पाचा समावेश आहे. फेडरेशनचा सध्याची वार्षिक उलाढाल वाढ करून २०२० पर्यंत ५० हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे.अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी यांनी इंडिया फूड फोरममध्ये बोलताना ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले, अमूलचे उद्दिष्ट शेतक-यांकडून जास्तीत जास्त दराने दूध खरेदी करणे व कमीत कमी दराने लोकांना विकणे आहे. त्यासाठी आम्ही आमच्या उत्पन्नापैकी एक टक्क्क्यापेक्षा जास्त रक्कम जाहिरातींवर खर्च करत नाही. गेल्या वर्षी अमूलने जाहिरातींवर केवळ ०.८ टक्के खर्च केला होता. इतर खाद्य पदार्थ कंपन्या त्यांच्या उत्पन्नापैकी ८ ते १५ टक्के रक्कम जाहिरातींवर खर्च करतात.

सोधी यांनी सांगितले की, शेतकरी ३० ते ४० गायी, म्हशींच्या माध्यमातून ४० हजार रुपये दरमहा कमवू शकतता. त्यासाठी त्यांना जवळपास २१ लाख रुपये गुंतवावे लागतील. पैकी त्यांना १५ लाख रुपये कर्जाद्वारे मिळू शकतील.

या राज्यांतही येणार प्रकल्प
*गुजरात, उत्तर प्रदेश प्रत्येकी - ३
*दिल्ली -२
*महाराष्ट्र व कोलकाता प्रत्येकी - १
भारतीय दूध व्यवसाय
*४ लाख कोटींचा भारतातील डेअरी बाजार
*८० हजार कोटी संघटित क्षेत्राचा वाटा
*३.२ लाख कोटी असंघटित क्षेत्राचा वाटा
अमूल कंपनीची उलाढाल
*१८,१५० कोटींचा टर्नओव्हर, २०१३-१४ मध्ये ३२ टक्के वृद्धी
*२६,००० कोटी उलाढाल सर्व संघटनांसमवेत ३७ टक्के वृद्धी
*३५ लाख सदस्य देशभरात
*२३० लाख दैनंदिन प्रक्रिया क्षमता