आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Analysis: भावनिक वक्तव्याची मुख्यमंत्री फडणवीसांची राजकीय खेळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठा मोर्चांची त्सुनामी लाट राज्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आपण पदावर राहू अथवा राहू.....’ या आशयाची केलेली भावनिक वक्तव्ये म्हणजे विचारपूर्वक खेळलेली राजकीय खेळी असल्याची चर्चा अाहे. या माेर्चांना राजकीय रंग देऊन त्यांची विश्वासार्हता कमी करणे अापली खुर्ची बळकट करण्याची खेळीही या मागे असल्याचे बाेलले जाते.
रविवारी नवी मुंबईत मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या माथाडी कामगारांसमोर मुख्यमंत्र्यांनी माेर्चा मराठा अारक्षणाबाबत भूमिका मांडली हाेती. “मी किती दिवस या पदावर राहील, हे महत्त्वाचे नाही. मात्र जितके दिवस राहील तितके दिवस परिवर्तनाचे काम करील,’ असे वक्तव्य फडणवीसांनी केल्याने अाता मराठा मोर्चांमुळे त्यांच्या खुर्चीला धाेका निर्माण झाला की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली अाहे. मात्र अशीच चर्चा रंगावी या उद्देशानेच मुख्यमंत्र्यांनी वरील वक्तव्य केल्याचे बाेलले जाते.
काेणत्याही राजकीय पक्षांनी आयोजित करताही मोर्चाला इतक्या प्रचंड संख्येने लोक येत असल्याने सरकारमध्ये अस्वस्थता अाहे. शेतकरी कर्जमाफी, शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे, अॅट्राॅसिटी कायद्यातील बदल, बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्रभूषण मागे घेणे, या माेर्चेकऱ्यांच्या मागण्यांवर थेट काहीही निर्णय घेण्याच्या स्थितीत सध्या तरी फडणवीस नाहीत. यामुळे या मागण्यांवरूनच दुसरीकडे लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्री हेतूपुरस्सरपणे अशी वक्तव्ये करीत असल्याचे सांगितले जाते. एकदा या माेर्चाच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले किंवा त्याला राजकीय रंग देण्यात यश आले अांदाेलकांमध्ये फूट पाडणे साेपे जाईल, अशी फडणवीसांची खेळी दिसते. एखाद्या अांदाेलनामुळे किंवा कुणाच्या मागणीमुळे थेट मुख्यमंत्री बदलाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र माेदी घेणार नाहीत याची खात्री फडणवीसांनाही अाहे. तरीही अापला खुंटा बळकट करून घेत पक्षश्रेष्ठींकडूनच अापली खुर्ची मजबूत करण्यासाठीही फडणवीसांनी ही भावनिक वक्तव्याची खेळी खेळली असावी, अशी शक्यता वर्तवली जात अाहे. पक्ष कार्यकर्त्यांकडून सहानुभूती मिळविण्याचाही त्यामागे प्रयत्न असावा. त्यामुळेच पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय फडणवीसांच्या जागी ज्यांच्या नावाची चर्चा अाहे त्या चंद्रकांत पाटलांनीच ‘भाजप मुख्यमंत्री बदलणार नाही,’ असे वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांची खुर्ची बळकटच केली अाहे.
बातम्या आणखी आहेत...