आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण : तिरस्कारानेच राणेंना ‘संपवले’, शिवसैनिकांत होता टोकाचा द्वेष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - १९९० च्या सुमारास कोकणात समाजवाद्यांच्या बालेकिल्ल्यात नारायण राणेंच्या माध्यमातून शिवसेनेच्या वाघाने डरकाळी फोडल्यानंतर विचारांची लढाई संपली अाणि मुद्यांऐवजी गुद्द्यांची लढाई सुरू होऊन पैसा व दहशतीचे राज्य पसरले. ही लढाई न पेलवल्याने काळाच्या रेट्यात समाजवादी संपले.... एकछत्री अंमल सुरू झाल्यानंतर २००६ च्या सुमारास सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी असलेले हे स्वयंघाेषित ‘कोकण सम्राट’ शिवसेेनेला आव्हान देत बाहेर पडले. कणकवलीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडवत ते काँग्रेसवासी झाले खरे, पण त्यांचा पिंड हा कधीच काँग्रेसी विचारांचा नव्हता. त्यांनी २५ वर्षांपूर्वी पेरलेल्या तिरस्काराने बहुसंख्य कोकणवासीयांच्या मनात असलेल्या त्यांच्याविराेधातील द्वेष २०१४ च्या निवडणुकीत उफाळून अाला. वांद्रेच्या पाेटनिवडणुकीतही तेच दिसून अाले. राणेंनी गेल्या २४ वर्षात जो तिरस्कार पेरला तोच अाज उगवून आला.... अशीच चर्चा राजकीय वर्तुळात अाहे.

राणे सत्तेशिवाय राहू शकत नाही. आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीत कुडाळमध्ये त्यांना पराभवाचा मोठा धक्का बसला, ताेही शिवसैनिकाकडूनच. पण, यामधून सावरत आपले नक्की कुठे चुकले, याचा विचार करण्याऐवजी त्यांनी प्रतिस्पर्ध्यांची लायकी काढली होती. त्यांचे थोरले चिरंजीव नीलेश राणेंना पराभूत करणा-या शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा अपमान करण्याची एकही संधी त्यांनी सोडलेली नाही. थेट लायकी काढून समाेरच्यांचा आत्मविश्वास खच्ची करायचा, हे राणेंचे मुख्य अस्त्र आहे. राज्यमंत्री दीपक केसरकर यांना तर नियोजन समितीच्या बैठकीत पदोपदी अपमानित करून त्यांना ‘बायल्या’ असेही राणेंनी संबोधले होते. याशिवाय आमदार भास्कर जाधव, विजय सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, यांचाही पाणउतारा त्यांनी वेळोवेळी केला.

हे कमी म्हणून की काय म्हणून थेट नेतृत्वावर म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावरही राणेंनी खालच्या पातळीवरची टीका केली. भाजप, राष्ट्रवादीसह अापल्या काॅंग्रेस पक्षाच्या कोकणातील नेत्यांनाही त्यांनी अपमानित केले हाेते. या सर्वांच्या मनात राणेंविषयी राेष हाेता. याचबरोबर मी म्हणेन तीच पूर्व िदशा अाणि मला जे कळते ते जगात कुणालाच कळत नाही, हा त्यांचा अहंकार त्यांच्याविषयी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांबरोबर सर्वसामान्य लोकांच्या मनात राग उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरला आहे.

वांद्र्याची शासकीय वसाहत, खार पूर्व, सांताक्रुझ येथील बैठ्या चाळींमधील मराठी माणूस व मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळून आपण सहज जिंकून येऊ असे राणेंना वाटत होते. मात्र १९ हजारांच्या फरकाने त्यांचा झालेला पराभव हा मोठा धक्का आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, शिवसेनेच्या मनात राग... ओवेसिंना नाकारले