आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनी विधानसभा : मतदारांचा काैलच ठरवेल महाराष्ट्र ‘घडतोय का िबघडतोय’ !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नगर पंचायत व नगर परिषद िनवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या अाणि राज्यात मिनी रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली. ‘महाराष्ट्र घडतोय’ हा राज्य सरकारचा दावा खरा की खाेटा हे अाता मतपेटीतूनच स्पष्ट हाेणार अाहे. अारक्षणाच्या मागणीसाठी निघणारे मराठा माेर्चे आणि दलित-ओबीसीच्या नाराजीचा फटका नेमका कुणाला बसेल, याचे उत्तरही ही निवडणूक देणार आहे. यासोबतच पुढील वर्षी हाेणाऱ्या मुंबईसह १० महापालिकांच्या निवडणुकीवरही या निकालाचे पडसाद उमटू शकतात.

युती सरकारला ३१ आॅक्टोबरला दोन वर्षे पूर्ण होत अाहेत. आघाडी सरकारची १५ वर्षांंची मक्तेदारी मोडीत काढून सत्तेवर आलेल्या युतीकडून जनतेला खूप अपेक्षा होत्या. त्या पूर्ण झाल्या की नाही, याचा कौल या निवडणुकांतून मतदार देणार असल्याने सत्ताधारी तसेच िवरोधकांसाठी ही निवडणूक म्हणजे अग्निपरीक्षाच असेल. फडणवीस सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामांबद्दल जनता मतपेटीतून अभिप्राय देईल. ‘भ्रष्टाचारमुक्त सरकार’ अशी प्रतिमा ठेवण्याचा फडणवीसांचा सुरुवातीपासून प्रयत्न असला तरी पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, िवनोद तावडे, िवष्णू सवरा यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप झाले. फडणवीस यांनी आपल्या सहकाऱ्यांना क्लीन चिट िदली असली तरी लोकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना भूखंड घाेटाळ्यावरून मंत्रिपद साेडावे लागले. या प्रकरणांचा ‘बाॅम्बगाेळा’ विराेधक सरकारवर चालवणार हे तर निश्चित, ते निष्प्रभ करण्यासाठी सत्ताधाऱ्यांची मोठी दमछाक होणार आहे.

युती सरकार हे फडणवीस यांच्या रूपाने एकखांबी तंबू असून ते एकटेच काम करत असल्याचे िचत्र दाखवले जात आहे अाणि हीच सरकारची सर्वात कमजोर बाजू आहे. एकाचवेळी सहा खाती सांभाळणाऱ्या खडसेंनी कामाचा सपाटा लावला होता, पण झटपट घेतलेल्या निर्णयांचे काय पडसाद उमटू शकतील, याची तमा त्यांनी बाळगली नाही अाणि अतिआत्मविश्वाचा फटका त्यांना बसला. खडसेंची गच्छंती झाल्यानंतर युती सरकारचे अस्तित्व िदसेनासे झाले आहे. पंकजा मुंडे, िवनोद तावडे यांनाही लगाम घातल्याने त्यात आणखी भर पडली. सुधीर मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील यांच्याकडे महत्त्वाची खाती असली त्यांचा अपेक्षित प्रभाव दिसत नाही.

शिवसेना स्वबळावर लढणार?
या सरकारमधील िशवसेेनेचे अस्तित्व असून नसल्यासारखे आहे. त्यामुळे सत्तेत असूनही सरकारवर टीका करण्याची संधी शिवसेना साेडत नाही. या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याचे संकेत अाहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी हे विराेधी पक्ष मात्र सरकारला काेंडीत पकडण्यात कमी पडत आहेत. विराेधक सरकारच्या कारभाराचा लेखाजोखा जनतेसमोर कसा मांडतात, यावरही त्यांचे अस्तित्व अवलंबून असेल.

मराठा आक्रोशाचा फायदा कुणाला
मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्याने विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले अाहे. मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोशाचा फायदा कुणाला िमळणार, याकडेही सर्वांचे लक्ष असेल. एकसंघ मराठा समाज एकगठ्ठा िवरोधकांना मतदान करतील, अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. कारण १५ वर्षे सत्ता असताना मराठा समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी आघाडी सरकारने िकती पुढाकार घेतला होता, याची जाणीवही या समाजाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...