आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Analysis: निवडणूक निकालांवर \'दिव्य मराठी\'चे संपादक, विश्लेषकांनी केलेले भाष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईसह महाराष्ट्रातील 10 मोठ्या शहरांमधील महापालिका निवडणुकीचे निकाल गुरुवारी लागले. 20 वर्षांत पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या बरोबरीने जागा पटकावल्या. यापूर्वी 1997 मध्ये पहिल्यांदा युती झाल्यानंतर भाजप हा पक्ष कायम शिवसेनेच्या मागे राहिला. दुसरीकडे गेल्या 56 वर्षांत कॉंग्रेसचा हा सर्वात खराब परफॉर्मन्स राहिला आहे. 10 पैकी 8 शहरांमध्ये भाजप नंबर वन पार्टी झाली असली तरी मुंबईत अशी अवस्था झाली आहे, की या दोन्ही पक्षांना युती करावी लागू शकते. तसेच देशाच्या आर्थिक राजधानीवर नोटबंदीचा कोणताही परिणाम झाला नाही, हे मुंबईत भाजपला जास्त जागा मिळाल्याने सिद्ध झाले आहे.

वाचा...  दिव्य मराठीचे स्टेट एडिटर प्रशांत दीक्षित यांचे अॅनॅलिसीस

1) पहिल्यांदा मोदींचा नव्हे तर फडणवीसांचा चेहरा प्रोजेक्ट करण्यात आला
- 2014 नंतर नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर ठेवून सर्व निवडणुका लढण्यात आल्या. यावेळी पहिल्यांदाच भाजपने मोदींचा चेहरा सोडून फडणवीस यांना प्रोजेक्ट केले. 
- लोकांनी फडणवीस यांची प्रामाणिक प्रतिमा आणि विकासाच्या मॉडेलला पसंती दिली. 
- फडणवीस यांचा हा वैयक्तिक विजय आहे. मोदी नसतानाही आपण विजय खेचून आणू शकतो याचा नवा फॉर्म्युला या निवडणुकीने दिला आहे.

2) शहरी भागात नोटबंदीचा परिणाम नाही
- नोटबंदीचा भाजपला तोटा सहन करावा लागेल असे निवडणुकीपूर्वी सांगितले जात होते. पण निकालांनी हे खोटे ठरवले. भाजपने केवळ शहरांमध्येच नव्हे तर ग्रामिण भागांमध्ये मोठे यश मिळवले आहे.

3) आतापर्यंत लहान भाऊ होता भाजप, आता बरोबरीत
- मुंबई महापालिकेचा विचार केला तर भाजप शिवसेनेचा लहान भाऊ होता. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिकमध्ये इतर पक्ष सत्तेत होते. तेथे भाजपचा क्रमांक तिसरा-चौथा लागायचा. पण या निवडणुकीत भाजपने पहिल्या क्रमांकावर येत वरील सर्व महापालिकांवर विजय मिळवला आहे.

4) मुद्दा आणि व्होट बॅंक
- मुंबईत मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन शिवसेनेने निवडणूक लढवली. मराठी मतदारांनी शिवसेनेला साथ दिली पण भाजपलाही नाकारले नाही. मुंबईतील निकालांवरुन हे स्पष्ट झाले आहे. 
-  भाजपने अमराठी मते आपल्याकडे घेण्यासोबतच मराठी मतेही गमावली नाही.

5) मुंबईत भाजप-शिवसेनेच्या मतांमध्ये अशी झाली विभागणी
- मुंबईत मतांची विभागणी केली तर वेस्टर्न सबर्बन परिसरात मराठी मते मोठ्या संख्येने आहेत. तर पुर्वेकडील परिसर अमराठी लोकांचा गड आहे. या दोन्ही भागांमध्ये भाजपला लक्षणिय मते मिळाली आहेत. 
- शिवसेनेचा केवळ मध्य मुंबईत प्रभाव दिसून येतो. पण नियोजित मते न मिळाल्याने सेनेची रणनिती फसल्याचे दिसून येते.
- भाजपने गैरमराठी मते आपल्याकडे खेचली आणि मराठी मतांनाही आकर्षित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

6) कॉंग्रेसचा मोठा पराभव
- 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर कॉंग्रेसला पहिल्यांदाच दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. 
- इतरही महापालिकांमध्ये कॉंग्रेसच्या जागा घटल्या. याचा विचार या पक्षाला करावा लागेल.

7) भाजप-शिवसेनेला सोबत राहण्यासाठी मतदारांनी बांधिल केले
- शिवसेनेने युती तोडली. यापुढे युती केली जाणार नाही असेही जाहीर केले. भाजपनेसुद्धा आपली भूमिका परखडपणे मांडत शिवसेनेला युती तोडण्यास बाध्य केले. पण जनतेने या दोन पक्षांना युतीच्या उंबरठ्यावर आणून सोडले आहे. 
- निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी दोन्ही पक्षांनी एकमेकांवर मोठी चिखलफेक केली. पण आता या दोन पक्षांना सोबत उभे राहावेच लागेल.
 
8) गुजरात आणि मध्य प्रदेशचा फॉर्म्युला प्रभावशाली
- या निकालानंतर भाजप गुजरात आणि मध्य प्रदेशचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू करु शकते.
- या दोन्ही राज्यांमध्ये भाजपने कॉंग्रेसपासून सत्ता मिळवली. त्यानंतर त्यावर कायम अधिकार गाजवला. 
- महाराष्ट्रात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री झाला आहे. आता इतरही निवडणुकांमध्ये भाजप यश मिळवत सत्तास्थाने तयार करु शकतो.
 
9) नोटबंदीला भाजपला झालाय फायदा
- ओडिशात 537 मधून 180 जागा जिंकल्या. गुजरातमध्ये 125 मधून 109 जागा जिंकल्या. फरीदाबादमध्ये 40 मधून 29 जागा जिंकल्या.
- चंदिगडमध्ये 26 पैकी 20 जागा मिळवल्या. मध्य प्रदेशमध्ये 35 पैकी 30 जागा जिंकल्या. राजस्थानमध्ये 37 मधून 19 जागांवर अधिकार मिळवला. महाराष्ट्रात 3705 पैकी 851 जागा जिंकल्या. आता यूपी-पंजाबवर नजर आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, दिव्य मराठीचे नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार यांचे अॅनॅलिसीस....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...