आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार आनंद परांजपे राष्‍ट्रवादीच्‍या वाटेवर, शरद पवारांचा शिवसेनेला दणका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसे राजकीय वातावरण तापले आहे. फोडाफोडीचे राजकारणही मोठ्या जोरात असून ठाण्‍यात राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेला जबर धक्‍का दिला आहे. शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे शरद पवारांच साथीला गेले असून चर्चा सुरु झाली आहे. मुंबईत शरद पवारांच्‍या पत्रकार परिषदेमध्‍ये आनंद परांजपे उपस्थित असून ते पवारांच्‍या बाजुलाच बसले आहेत. परांजपे हे पवारांच्‍या व्‍यासपीठावर असून त्‍यांच्‍या राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमध्‍ये प्रवेशाची चर्चा जोरात सुरु झाली आहे. शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेली शिवसेना आता राहीलेली नाही. निष्‍ठावान शिवसैनिकांची गळचेपी आजच्‍या शिवसेनेत होत आहे. शिवसेना पुर्वी एक कुटुंब होते. प्रत्‍येकाच्‍या सुखादुःखात आम्‍ही सहभागी व्‍हायचो. मी जन्‍मापासून शिवसेना बघितली ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, आणि दिवंगत प्रकाश परांजपे यांच्‍या रुपाने. पंरतु, आज सत्तेसाठीच शिवसेना, असे स्‍वरुप आले आहे. विकासाच्‍या कामांवर शिवसेनेत चर्चा होत नाही, अशी खंतही परांजपे यांनी व्‍यक्त केली. आता केवळ शरद पवारांची भेट घेतली आहे. अजून लांब पल्‍ला गाठायचा आहे, असा सां‍केतिक इशारा परांजपे यांनी दिला.
यासंदर्भात राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी मात्र परांजपे हे राष्‍ट्रवादीच्‍या वाटेवर असल्‍याचे फेटाळले. परांजपे यांनी केवळ व्‍यथा मांडली. एका निवडून आलेल्‍या खासदाराने संपूर्ण जिल्‍ह्यातील शिवसेनेची व्‍यथा मांडली आहे, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे आव्‍हाड म्‍हणाले.
तर काल पंडितअण्‍णा मुंडे यांनी राष्‍ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्‍याबद्दल बोलताना पवार यांनी सांगितले, ते तर वर्षभरापुर्वीच राष्‍ट्रवादीत येण्‍याच्‍या तयारीत होते. त्‍यावेळी त्‍यांनी मला संपर्क केला होता. त्‍यावेळी त्‍यांना घरगुती वाद मिटविण्‍याचा सल्‍ला दिला होता, असे पवार म्‍हणाले.
'आधी खासदारकी सोडा मग राष्‍ट्रवादीत जा'
परांजपेंना शिवसैनिक कदापि माफ करणार नाहीः सरनाईक यांची टीका
घर का फुटलं? गोपीनाथ मुंडेंनी आत्मपरिक्षण करावे- अजित पवार
ठाकरे, पवार आणि निवडणुकीचा पव्वा !
आम्हाला काकापासून वाचवा!, अजितदादांचे ‘काकां’वर शरसंधान