आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समाज एकत्र अाल्यास मुख्यमंत्री अाेबीसींचाच - अानंदराज अांबेडकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मंडल अायाेगानंतर जागे झालेल्या अाेबीसी समाजाने उत्तरेत सत्ता िमळवली. पण दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या अाेबींसी नेत्यांना मंडलचे राजकारण कळलेच नाही. राज्यात सर्वाधिक अाेबीसींचा टक्का असून हा समाज एकत्र अाल्यास महाराष्ट्रात अाेबीसी समाजाचाच मुख्यमंत्री हाेईल,’ असे भाकीत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अानंदराज अांबेडकर यांनी रविवारी केले.

माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात अायाेजित कुणबी जागर महामेळाव्यात ते बाेलत हाेते. ‘बहुजन, बाैद्ध यांना साेबत घेऊन वाटचाल केली तर महाराष्ट्रात इतरांची सत्ता येण्याची टापच राहणार नाही. परंतु दुर्दैवाने अाजपर्यंत हा प्रयत्न झाला नाही. मराठा समाजाने लाखाेंचा माेर्चा काढल्यानंतर अापल्या अारक्षणावर गदा येण्याच्या भीतीतून अाता कुणबी समाज खऱ्या अर्थाने जागरूक झाला अाहे. अाता तरी हा प्रयत्न केला तर ताे नक्कीच यशस्वी हाेईल,’ असा विश्वासही अांबेडकर यांनी व्यक्त केला. अाज लाखाेंचे माेर्चे काढून मराठ्यांना अारक्षण मिळवण्याचे प्रयत्न केले जात अाहेत. हे प्रश्न केवळ राज्यातच नाहीत. गुजरातमध्ये पाटीदार, हरियाणात जाट समाजही हीच मागणी करत अाहेत. अारक्षणावरून रणकंदन माजवायचे अाणि मग कुणालाच अारक्षण नकाे असे म्हणून ते काढून टाकायचे, असा सुप्त प्रयत्न या देशात केला जात असल्याचा अाराेपही अांबेडकर यांनी केला. या जागर मेळाव्याला राज्याच्या कानाकाेपऱ्यातून जवळपास तीन हजार कुणबी बांधव उपस्थित हाेते.

राज्यघटनेच्या माथी अपयश मारण्याचा डाव : माेदी सरकारच्या नाेटाबंदीच्या निर्णयावर टीका करताना अानंदराज म्हणाले, ‘अाज अापल्याच बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी सामान्यांना िभकाऱ्यासारखे रांगेत उभे राहावे लागत अाहे. लाेक त्रस्त झाल्यानंतर त्यांना सांगायचे, ‘काेणताही कायदा कितीही केला तरी भ्रष्टाचार संपत नाही. या देशातून भ्रष्टाचार काही जात नाही. काळा पैसा नष्ट हाेत नाही,’ अाणि मग या सगळ्या गाेष्टी राज्यघटनेच्या माथी मारण्याचे प्रयत्न सुरू अाहेत,’ असा अाराेपही त्यांनी केला.

कुणबी घेणारा नव्हे तर देणारा : अविनाश लाड
‘राजकारण, राेजगार, िशक्षण अशा विविध क्षेत्रांत कुणबी समाज अातापर्यंत मागेच राहिला. त्यामुळे या समाजाच्या भावी पिढीसाठी अाता जागर केला अाहे. यापुढे कुणबी समाज घेणारा नव्हे तर देणारा म्हणून भूमिका पार पडेल,’ असे कार्यक्रमाचे िनमंत्रक अविनाश लाड म्हणाले. तर महादेव िशगवण यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व कुणबी संघटनांनी एकत्र येऊन या लढ्याला साथ द्या, असे अावाहन केले.
बातम्या आणखी आहेत...