आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anandraj Ambedkar News In Marathi, Mumbai, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांना अटक व जामीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जमावबंदी आदेशाचे उल्लंघन इंदू मिलमध्ये कार्यकर्त्यांसह ठिय्या देणारे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यासह सात कार्यकर्त्यांना गुरुवारी अटक झाली.

इंदू मिलची जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाकरिता मिळण्यासाठी आनंदराज यांनी 6 डिसेंबर 2011 रोजी कार्यकर्त्यांसह इंदू मिलमध्ये घुसखोरी केली होती. हे आंदोलन 24 दिवस चालले होते. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी 23 जणांवर गुन्हा नोंदवून महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. गुरुवारी आनंदराज यांच्यासह सात कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. भोईसर न्यायालयाने त्यांची प्रत्येकी 10 हजारांच्या जामिनावर मुक्तता केली.